चीनमधील तरुण-तरुणी AI पार्टनर गेल्याच्या दुखात, Cyber ​​Widowhood आहे तरी काय?

नवी दिल्ली: चीनमधील एक संकल्पना सध्या जगभराचं लक्ष वेधून घेत आहे. या संकल्पनेचं नाव आहे Cyber Widowhood. म्हणजेच सायबर वैधव्य. चीनमध्ये कित्येक तरुण सध्या दु:खात आहेत. आपला जोडीदार गेल्यावर जो त्रास एखाद्या व्यक्तीला सहन करावा लागतो, अगदी तसाच त्रास या तरुणांना होत आहे. चीनमधील कित्येक तरुण-तरुणी 'एआय कम्पॅनियन'च्या प्रेमात आहेत. ते याच एआयसोबत गप्पा मारतात, भावनिक आधार देतात आणि त्यांच्याशी रोमान्सही करतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीप्रमाणे AI Companion त्यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग होऊन जातो.


चीनमधील तरुण पिढी सध्या मोठ्या प्रमाणात 'एआय कम्पॅनियन' (AI Companion) अ‍ॅप्सचा वापर करत आहे. हे अ‍ॅप्स वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीनुसार, स्वभावानुसार आणि दिसण्यानुसार एक आभासी (Virtual) जोडीदार तयार करून देतात. एका तंत्रज्ञानाने हा पार्टनर तयार केलेला असल्याने तो वापरकर्त्यासाठी अगदी साजेसा असतो. हा 'एआय कम्पॅनियन' त्यांना सर्व गोष्टीत साध देतात. भावनिक आधार देतात. त्यांच्या सुख-दुखात आभासी पद्धतीने सहभागी होतात. मात्र ज्यावेळी 'एआय कम्पॅनियन' अॅप अपडेट होतो किंवा काही तांत्रिक कारणांमुळे ते पात्र डिलिट होतं त्यावेळी मात्र अनेक तरुण-तरुणी आपल्या 'एआय कम्पॅनियन'च्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतात.



मानसिक त्रास आणि एकटेपणा जाणविण्याची भीती...



तंत्रज्ञान बदलले तरी माणसाची भावनिक आधाराची गरज तीच आहे. फरक इतकाच आहे की, आता एआयमुळे हे जोडीदार अधिक वास्तववादी वाटू लागले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते यापूर्वीही ओटोम गेम्स' (Otome games) किंवा भाड्याने व्हर्च्युअल बॉयफ्रेंड मिळण्याच्या सुविधा उपलब्ध होत्या. मात्र प्रत्यक्षात व्यक्तीशी संवाद साधण्याऐवजी एआयवर अवलंबून राहणं योग्य नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. तंत्रज्ञानालाही मर्यादा आहेत. मात्र एआयवर अतिरिक्त अवलंबून राहिल्याने तीव्र मानसिक त्रास आणि एकटेपणा जाणवू शकतो. प्रत्यक्षात नातेसंबंधात गुंतागुंत असते, मात्र एआय नेहमी वापरकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागतो. परिणामी लोक वास्तवापासून दूर जातात.

Comments
Add Comment

Parth Pawar Rajya Sabha MP Oath : गुलाबी जॅकेट अन् डोळ्यांवर चष्मा...हुबेहूब अजित दादा! पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड आज देशाच्या राजधानीत पाहायला मिळाली. दिवंगत अजित

Trending News : कमळाच्या देठातून श्वास घेत 5 तास लपला; सराईत चोरटा अखेर सापडला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) राबवलेली कारवाई अत्यंत थरारक ठरली.

Amazon Layoffs : ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकर कपातीची टांगती तलवार; १४,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये मक्तेदारी निर्माण करणारी कंपनी ॲमेझॉन (Amazon)

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

Ahmedabad Toodler Death : डोशाच विषारी पीठ की जाणीवपूर्व केलेला विषप्रयोग ? पोलिसांचा संशय बळावला

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा येथे झालेल्या दुहेरी मृत्यूने सर्वाना धक्का बसला आहे. एकाच

Subansiri News : महागड्या विजेचा फटका: आसाम आणि मेघालयचा सुबनसिरी प्रकल्पातील अतिरिक्त वीज घेण्यास नकार

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी जलविद्युत योजना असलेल्या २००० मेगावॅट क्षमतेच्या 'लोअर सुबनसिरी' (Subansiri Lower HEP)