APMC Market : आंबा खवय्यांना पर्वणी; एपीएमसी बाजारात तब्बल सहा हजार पेट्यांची आवक

नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी बाजार येथे कोकणातून येणाऱ्या आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. तब्बल सहा हजार पेट्या बाजारात दाखल झाल्याने आंबा खवय्यांसाठी ही एक पर्वणी ठरली आहे. मात्र आंब्याचे दर अजूनही वरचढ असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.


मागील काही दिवसांपासून कोकणातून येणाऱ्या आंब्याची आवक वाढू लागली असून आज नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात तब्बल सहा हजार पेट्यांची आवक झाली आहे. चालू हंगामातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवक असल्याचे सांगितले जात आहे.


मात्र वातावरणातील सतत होणारे बदल, धुके आणि तापमानातील चढउतार यामुळे आंबा पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा खराब होऊन कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.


सध्या बाजारात एका पेटीचा दर सुमारे चार हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंत आहे. पुढील काही दिवसांत आंब्याची आवक वाढण्याची शक्यता असली तरी दर मात्र वरचढ राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान, कोकणातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता आंबा खवय्यांनी थोडीशी खिशाला कात्री देत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहनही आंबा व्यापाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

Congress: काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर

मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर राजकीय

Uttar Pradesh Accident: बोलेरोने मागून उभ्या असलेल्या टँकरला दिली धडक; अपघातात ५ जण ठार, अनेक जण जखमी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

Baramati Assembly by-election : बारामती पोटनिवडणुकीत महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी

- निवडणूक बिनविरोध करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे इतर सर्व पक्षांना आवाहन ठाणे : बारामती विधानसभा

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या