आमच्या मुलीशी का बोलतोस? म्हणून केला खून; पुण्यात तरुणाची निर्घृण हत्या

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात तरुणाच्या मृत्यूची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीशी संपर्क असल्याच्या कारणावरून 23 वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नागेश जाधव आणि संबंधित मुलगी यांच्यात पूर्वीपासून मैत्री होती. मात्र या मैत्रीला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध असल्याचे सांगितले जाते. नागेश हा पुण्यात शिवाजीनगर परिसरातील एका खासगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करत होता, तर त्याची आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती.


या प्रकरणात नागेशच्या आईने पोलिसांकडे तक्रार देत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, 14 तारखेला संबंधित मुलीने नागेशला फोन करून भेटण्यासाठी बोलावले होते. तो तिला भेटण्यासाठी गेला असता तेथे आधीपासून उपस्थित असलेल्या काही जणांनी त्याला अडवून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


नागेशला बेदम मारहाण करण्यात आल्यानंतर रात्री उशिरा त्याच्या आईला फोन करून शिवीगाळ करत मुलाला घेऊन जाण्याची धमकी देण्यात आल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे ही घटना घडली आणि त्यामागे आणखी काही कारणे आहेत का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

Congress: काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर

मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर राजकीय

Uttar Pradesh Accident: बोलेरोने मागून उभ्या असलेल्या टँकरला दिली धडक; अपघातात ५ जण ठार, अनेक जण जखमी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

Baramati Assembly by-election : बारामती पोटनिवडणुकीत महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी

- निवडणूक बिनविरोध करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे इतर सर्व पक्षांना आवाहन ठाणे : बारामती विधानसभा

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या