वाचनाचे महत्त्व?

कथा : प्रा. देवबा पाटील


उद्या सीता व नीताची मावशी तिच्या गावाला जाणार होती. म्हणून त्या थोड्याशा नाराजच होत्या. त्यांच्या नाराज चेह­ऱ्यांकडे बघून मावशीने विचारले, “काय गं सोनुल्यांनो, आज अशा नाराज का आहात तुम्ही?”


“मावशी तुम्ही उद्या तुमच्या घरी जाणार आहात ना?” सीताने विचारले.
“त्यामुळे आमचे काही लक्ष लागत नाही मावशी.” नीताने उत्तर दिले.


“म्हणून नाराज आहेत काय माझ्या सोनुल्या. अगं त्यामुळे असे नाराज थोडेच व्हायचे असते. मी पुन्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्याकडे येणारच आहे,” मावशी म्हणाली, “चला बरं. घ्या, ती सतरंजी नि चला गच्चीवर. नेहमीसारख्या आपण गच्चीवर जाऊन मनसोक्त गप्पा करू.”


“मावशी आज तुमच्याकडून आम्हाला रोज दिसणा­ऱ्या आकाशाच्या विविध रंगांबद्दलची व इतरही बरीच छानशी उपयोगी वैज्ञानिक माहिती मिळाली,” सीता म्हणाली.
“पण मावशी? तुम्हाला इतकी माहिती कोठून समजली?” नीताने विचारलेच.


मावशीने स्पष्टीकरण दिले, “अगं मी भौतिकशास्त्राची प्राध्यापिका असून दररोज नित्यनेमाने वाचन करते. वेगवेगळ्या प्रकारची, विविध विषयांची खूप खूप पुस्तके वाचते. जे वाचन करते त्यावर विचार करते, त्याचे चिंतन करते, त्यातील चांगले, कामाचे पक्के लक्षात ठेवते. आवश्यकता भासल्यास लिहूनसुद्धा ठेवते की जे वेळोवेळी मला मार्गदर्शक ठरते, उपयोगी पडते.”


“अन्न जसे शरीराचे पोषण करतात तसेच वाचन मनाचे पोषण करतात. जसे, जेवण हे सावकाश, नेमस्तपणे व नियमाने असेच केले असता अंगी लागून शरीरास हितावह होते. त्याचप्रमाणे वाचावयाची पुस्तके जर पूर्ण लक्ष देऊन, मननपूर्वक असे हळूहळू वाचले तरच त्यापासून ज्ञानाचा लाभ होऊन आपल्या निरनिराळ्या मानसिक शक्ती वृद्धिंगत होतात. आपली स्मरणशक्ती वाढते. बुद्धीचा विकास होतो आणि हे ज्ञान आपणास अडचणीत उपाय सुचविते. संकटकाळी मार्ग दाखविते, आपले धैर्य वाढविते. आपणास योग्य निर्णय घेण्याची शक्ती देऊन आपले खूप भले करते. त्यासाठी तुम्हीसुद्धा रोज कमीतकमी अर्धा तास तरी चांगली, बोधप्रद कवितांची पुस्तकं, संस्कारक्षम गोष्टी, विज्ञानाची माहिती देणारे लेख वाचीत जा. त्यातील तुमच्या उपयोगी माहिती, सुवचने लक्षात ठेवून तुमचा ज्ञानसंग्रह वाढवून बुद्धीच्या कक्षा वाढवत जाव्यात. मग कराल ना रोज थोडं थोडं प्रबोधनात्मक ज्ञानवर्धक वाचन?”


“होय मावशी, आम्ही दररोज नियमितपणे तुम्ही सांगितल्यानुसार वाचन करू,” नीता म्हणाली. “मावशी आम्ही आपल्या खूप आभारी आहोत,” दोघीही म्हणाल्या. “यात आभार कसले आले गं! आभार तर परक्यांचे मानायचे असतात, आपल्या माणसांचे नव्हे. माझ्या लाडक्या मुलींनो! विद्यार्थ्यांना शिकविणे, त्यांच्या अडचणी सोडविणे, त्यांचे शंका-समाधान करणे, त्यांना सुयोग्य मार्गदर्शन करणे हे माझे आद्यकर्तव्य आहे. तुम्ही तर माझ्या मुली आहात. माझ्या मुलींना सांगणे तर माझेच काम आहे. मी नाही सांगणार तर दुसरे कोण येणार आहे त्यांना सांगायला? उलट तुम्ही इतक्या शंका विचारल्यात आणि मी सांगितलेले कान टवकारून, जीव ओतून ऐकून घेतले यावरून मला तुमच्या औत्सुक्याची, ज्ञान ग्रहण करण्याच्या आवडीची प्रचिती आली. हे बघून तसेच तुमच्या अभ्यासाव्यतिरिक्तच्या अवांतर वाचनाच्या सुयोग्य वाटचालीबद्दल मला आनंदही झाला” मावशी बोलली.


“बरं मावशी, पण पुढील वेळी तुम्ही आम्हास दुसरी नवीन वैज्ञानिक माहिती जरूर सांगावी अशी आमची विनंती आहे.” दोघींनीही मावशीला अशा प्रकारच्या शब्दांत विनंती केली. “ठीक आहे माझ्या छकुल्यांनो. आता मी तुम्हाला आकाशाच्या विविध रंगांबद्दल माहिती सांगितली. पुढच्या वेळी मी तुमच्यासाठी प्रा. देवबा शिवाजी पाटील यांचा ‘नभ नवलाई’ हा सुरेखसा बालकाव्यसंग्रह आणेल व त्यातून तुम्हाला आकाशातील विविध घटना-प्रक्रियांची माहिती सांगेल,” मावशीने असे सांगितल्यांने दोघींनाही अत्यानंद झाला. एवढ्यात “स्वयंपाक झाला आहे. आता तिघीही जेवायला खाली या,”असा आईने आवाज दिला. त्यांनी सतरंजी उचलली, घडी केली व तिघीही गच्चीवरून खाली येण्यासाठी घराच्या जिन्याच्या पाय­या उतरू लागल्या.


Comments
Add Comment

समुद्रात बेटे कशी तयार झाली?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील   मंदिरात शिवम मित्र गटाच्या ज्ञान विज्ञानाच्या गोष्टी खूपच वाढत होत्या. “मग

फक्त पुस्तकी पंडित बनू नका

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर   ज्ञान हे माणसाच्या जीवनाला दिशा देणारे सामर्थ्य आहे; परंतु केवळ पुस्तके

दिसतं ते विकतं

प्रतिभारंग-प्रा. प्रतिभा सराफ   व्हिएतनामला एका थ्रीडी फोटो म्युझियमला भेट दिली होती. तिथे गेल्यावर अगदी

राजकन्या

कथा-रमेश तांबे   एक होती राजकन्या. राजाची एकुलती एक मुलगी! तिला ना भाऊ होता, ना बहीण! एवढ्या मोठ्या राजवाड्यात

चांगल्या वागण्यातून घडते चरित्र

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर   “माणसाच्या आयुष्यात ज्ञान, संपत्ती, पद किंवा प्रसिद्धी यांना महत्त्व

स्वातंत्र्याची किंमत...

कथा-रमेश तांबे   एक होतं माकड. अंगानं होतं राकट. एका जंगलात राहायचं, ताजी ताजी फळं खायचं. झाडावर राहायचं, झाडावरच