मेरा भारत महान

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड


भारतीय नवरे लाडावलेले असतात असे मी एका विदेशातल्या भाषणात म्हटले, तेव्हा उपसंहाराच्या वेळी जी स्त्री आभार मानायला उठली. ती म्हणाली, “विजयाबाईच्या लाडावलेल्या भारतीय नवरे, यांच्या विधानात मी थोडी भर घालू इच्छिते. जगातले समस्त नवरे लाडावलेले असतात. यावर समुहातील सर्व स्त्री वर्गाचे एकमत झाले.


एक पुरुष जन्म घ्यावा नि आरामाची जिंदगी जगावी!” समस्त स्त्री वर्ग या विधानाशी सहमत होता. तर आमचे है’ म्हणजे यजमान ! विदेशात फिरताना कधी चहाची लहर त्यांना येईल हे सांगणे कठीण जायचे. अडीच डॉलर त्यावर एकदा खर्च करणे शक्य होते. अडीच डॉलरला चिकन राईस, व्हेज राईस मिळत असे भरपूर ! तो एकदा खाल्ला तर ‘पेट’ भरती होऊन जाई. आमची मोठी मुलगी प्राजक्ता दोघांना १० डॉलर देई. त्यावेळी एका वेळचे जेवण नि चहा होऊन जाई. सायंकाळी तिच्या घरी जेवण होत असे. पोटभर ! नि छान, चवदार. रोज बाबांना नि मला तळकट नि चविष्ट वडापाव, भजी, दाण्यांचा कुटाचे वडे असे काहीतरी चविष्ट ती बनवे. जीव अगदी खुश होऊन जाई.


आता दक्षिण भारतात आम्ही फिरत होतो. जेवण बाहेर घ्यावे लागे. त्याची व्यवस्था निशूने माझ्या धाकट्या मुलीने केली होती. जेवणापुरते, चहासाठी तिने दिलेला पॉकेटमनी सहज पुरे. तर आमचे यजमान! त्यांना फिरता फिरता लहर आली
चहा प्यायची.


“अहो, कितीदा चहा चहा करता?”
“अगं, चहाच तर मागतोय णा ? खायला प्यायला तर मागत नाही ना? शिवाय भारतात चहाला खूप कमी रुपये लागतात आणि बचत करायची असली तर एकच चहा घेऊ.”
“म्हणजे तुमच्यापुरता?” मी रागाने म्हटले.
“दोघं हाफ हाफ कप घेऊ गं. मी एवढा दृष्ट नाही, की मी एकट्यानं चहा घ्यावा नि तु नुसतं बघत राहावंस.”
मलाच माझ्या बोलण्याची लाज वाटली.
पण आता पश्चाताप होऊन काय उपयोग? माझे बोलून झाले होते. बोलून थोडक्यात गमावले होते. इतकाली वर्ण लग्नाला झाल्यावर दोघेही स्वभावाने बोथट होतात हेच खरे. फारसं कोणी मनाला लावून घेत नाही.
फिरत फिरत आम्ही एका घराजवळ आलो. घर बैठे होते. उंचावर होते. जवळपास दुसरी घरे नव्हती. हे म्हणाले, “या घरी जाऊ या.
‘पैसे देऊ’ असे आधी सांगूया म्हणजे संकोचाचा प्रश्नच नाही.”
“ही आयडिया मस्त आहे.” ह्यांचे बोलणे मला मनापासून आवडले. आम्ही नमस्कार करून घरात शिरलो.
“फार दमायला झाले आहे.” मी
“खूप चहा प्याव्सा वाटतो आहे” हे
“जवळपास चहाचे दुकान नाही.” मी
“आम्हांला एकेक कप साखरेचा चहा
मिळेल का?” हे
“अवश्य.” ते घरवाले म्हणाले.
त्यांनी बसायला सतरंजी अंथरली. “बैठो साहेब.” ते म्हणाले.
“साहेब नही, मेहमान बोलो. हे बसकण मारीत म्हणाले.
“चहाचे पैसे आम्ही देऊ हं!”
मी पुन्हा म्हणाले.
टूटीफुटी मराठी मुझे आती है.”
घराचे गृहस्थ म्हाणाले.
“मुझे अच्छी हिंदी आती है.” मी बोलण्यावर जोर देत म्हणाले. चाय बनाओ. बडी मेहरबानी होगी.” मी म्हणाले.
“पैसे हम देंगे। हे पैशावर जोर देत
म्हणाले. हो!


कुणाला वाटायला नको... पैसे वाचवायला हे दोघे घरात घुसले म्हणून. यह डेंटल सर्जन है। और मैं मुख्याध्यापक हूँ। बंबई के पोदार नामक नामचिन स्कूल में ।’ “ओह! पोदार की यहाँ भी शाखा है। मेरा बच्चा पोदारहीमे पढता है। अब तो उस हिसाबसे हम एक स्कूलवाले, पोदाराईट हो गये।” आता आम्ही आसनस्थ झालो. चहा आला. बिस्किटे आली. त्या घरातल्या गृहिणीने अतिशय चविष्ट पोहे बनविले. ताटलीत घालून दिले नि त्यावर लिंबूही पिळले.


खूपच छान झाले आहेत पोहे नि चहामुळे थकवा पार गेला. तुमचे कसे आभार मानू?” आमी पैसे देऊ केले तेव्हा “हम गरीब जरूर है। लेकीन इतने गरीब नहीं कि मेहमानोंसे पैसा ले ।” त्यांनी हात जोडले. आम्ही दोघे एकसुरात म्हणालो, “मेरा भारत महान !”

Comments
Add Comment

समाजमाध्यमांच्या आहारी...

दखल : मंजिरी ढेरे अलीकडच्या काही महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी मुलांच्या ‌‘सोशल मीडिया‌’ वापरावर

जादू जेवर विमानतळाची

पैलू : अजय तिवारी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एव्हिएशन क्षेत्रातील ‌‘आर्थिक गळती‌’ थांबवण्याचा लक्षवेधी

गावची जत्रा - आठवणींचा दरवळ

स्मृतीगंध : लता गुठे वेळ दुपारची, एसी गाडीतही जाणवणारं रणरणतं ऊन, डांबरी सडकेवर खेळणारं मृगजळ आणि रस्त्याच्या

‘उठो, हमारा सलाम ले लो’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ‘मुगले आझम’(१९६०)मध्ये दिलीपकुमार (सलीम उर्फ जहांगीर) आणि मधुबाला (अनारकली)

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

स्पंदन : अश्विनी शिंदे - भोईर गावाचं गावपण राखून असलेलं बोर्डी हे डहाणू तालुक्यातील निसर्गरम्य गाव. भारत

ब्रह्मचर्य व गृहस्थ धर्म

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे भारतीय परंपरेत मानवी जीवन चार आश्रमात विभागले आहे. ब्रह्मचर्याश्रम,