निवडणूक आयोगाने केली पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.



कोणत्या राज्यात कधी निवडणूक ?




  1. आसाम - ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान

  2. केरळ - ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान

  3. पुदुच्चेरी - ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान

  4. तामिळनाडू - २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान

  5. पश्चिम बंगाल - २३ आणि २९ एप्रिल २०२६ रोजी मतदान

  6. सर्व ठिकाणची मतमोजणी - ४ मे २०२६


बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक


मतदान - २३ एप्रिल २०२६


मतमोजणी - ४ मे २०२६


बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक, असा आहे कार्यक्रम


अधिसूचना - ३० मार्च २०२६


उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस - ६ एप्रिल २०२६


अर्ज छाननी - ७ एप्रिल २०२६


माघारीचा शेवटचा दिवस - ९ एप्रिल २०२६


मतदान - २३ एप्रिल २०२६


मतमोजणी - ४ मे २०२६



कोणत्या राज्याच्या विधानसभेची मुदत कधी संपणार ?


आसाम विधानसभेचा कार्यकाळ २० मे रोजी, केरळचा २३ मे रोजी, तामिळनाडूचा १० मे रोजी, पश्चिम बंगालचा ७ मे रोजी आणि पुद्दुचेरीचा १५ जून रोजी संपत आहे.


महाराष्ट्रातील दोन पोटनिवडणुका


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू (Death) झाला. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. यामुळे बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघ रिक्त झाले आहेत.


आधीच्या विधानसभा निवडणुकांवेळी संबंधित राज्यांमध्ये काय झाले होते ?




  1. आसाम - १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झाले. रालोआने ७५ जागा जिंकल्या आणि भाजपच्या नेतृत्वात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली.

  2. पश्चिम बंगाल - २९४ जागांसाठी आठ टप्प्यात मतदान झाले. तृणमूल काँग्रेसने २१५ आणि भाजपने ७७ जागा जिंकल्या. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या.

  3. तामिळनाडू - २३४ विधानसभेच्या जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. द्रमुकने १३३, अण्णाद्रमुकने ६६ आणि भाजपने ५ जागा जिंकल्या. द्रमुकचे एमके स्टॅलिन मुख्यमंत्री झाले.

  4. केरळ - १४० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. एलडीएफने ९९ आणि यूडीएफने ४१ जागा जिंकल्या. सीपीआयचे पिनारायी विजयन सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.

  5. पुद्दुचेरी - ३० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. एनडीएने १६, तर यूपीएने ९ जागा जिंकल्या. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अखिल भारतीय एन.आर. काँग्रेसचे एन. रंगास्वामी मुख्यमंत्री झाले.


Comments
Add Comment

Toxic Movie : 'टॉक्सिक' सिनेमा कसा आहे ? यशचा स्वॅग भारी, पण 'केजीएफ'सारखी जादू चालणार का ?

मुंबई : 'केजीएफ २'च्या (KGF 2) अफाट यशाने अख्ख्या जगाला वेड लावणारा साऊथ सुपरस्टार यश (Yash) तब्बल चार वर्षांनंतर पडद्यावर

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे

MPSC Paper Leak News : प्रेयसीसाठी पठ्ठ्याने फोडला 'एमपीएससी'चा पेपर

- पोलिसांच्या अहवालानंतर परीक्षा प्रक्रिया रद्द; एका प्रेमकहाणीमुळे हजारो उमेदवारांच्या करिअरला फटका मुंबई :

CM Devendra Fadnavis : विरोधी पक्षाच्या खासदारांना DPDC मधून निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning and Development Committee) निधीवाटपात सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव न करता विरोधी

Kuku Kohli Dies : चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन; अश्रूधाल्या डोळ्यांनी अरुणा इराणींचा निरोप, बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgan) 'फूल और कांटे' चित्रपटातून पहिला ब्रेक देणारे