राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर

नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहिल्यानगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.


राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी ही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.


निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी आवश्यक कार्यक्रम जाहीर केला असून मतदानासाठी सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यांचा वापर करण्यात येणार आहे.


मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) हा मुख्य पुरावा असेल. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड आदी कागदपत्रेही ग्राह्य धरली जाणार आहेत.


दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राहुरी आणि बारामती मतदारसंघात आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती उमेदवार आणि राजकीय पक्षांनी प्रचार काळात तीन वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.


भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार मतदान २३ एप्रिल २०२६ रोजी होणार असून मतमोजणी ४ मे २०२६ रोजी केली जाणार आहे.


जाहीर कार्यक्रमानुसार ३० मार्च २०२६ (सोमवार) रोजी निवडणुकीसाठी राजपत्र अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ एप्रिल २०२६ (सोमवार) निश्चित करण्यात आली आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी ७ एप्रिल २०२६ (मंगळवार) रोजी होणार आहे.


उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ एप्रिल २०२६ (गुरुवार) आहे. त्यानंतर संबंधित मतदारसंघांमध्ये २३ एप्रिल २०२६ (गुरुवार) रोजी मतदान पार पडेल.


मतदानानंतर ४ मे २०२६ (सोमवार) रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ६ मे २०२६ (बुधवार) पर्यंत पूर्ण केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.


या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणांना आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.


Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

Congress: काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर

मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर राजकीय

Uttar Pradesh Accident: बोलेरोने मागून उभ्या असलेल्या टँकरला दिली धडक; अपघातात ५ जण ठार, अनेक जण जखमी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

Baramati Assembly by-election : बारामती पोटनिवडणुकीत महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी

- निवडणूक बिनविरोध करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे इतर सर्व पक्षांना आवाहन ठाणे : बारामती विधानसभा

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या