Kuldeep Yadav Marriage: कुलदीप यादव लवकरच विवाहबंधनात अडकणार; कोण आहे कुलदीपची पत्नी?

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा 'चायनामैन' गोलंदाज कुलदीप यादव लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. कुलदीपची होणारी पत्नी वंशिका ही त्याच्या बालपणाची मैत्रीण आहे. दीर्घकाळाच्या नात्यानंतर आता हे दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत. वंशिका कानपूरची रहिवासी असून तिचे वडील योगेंद्र सिंह चड्ढा एलआयसीमध्ये कार्यरत आहेत. २०१७ मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वंशिका उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेली होती. सध्या ती तिथेच स्थायिक असून एका नामांकित कंपनीत कार्यरत आहे.


कुलदीप आणि वंशिका यांचा विवाह सोहळा मसुरीमध्ये पार पडणार आहे. ऐतिहासिक हॉटेल 'सवाय' या सोहळ्याचा साक्षीदार असणार आहे. १४ मार्च रोजी मुख्य विवाह सोहळा पार पडेल. तर तत्पूर्वी १३ मार्च रोजी हळद आणि मेहंदीचे विधी पार पडतील. या शाही विवाहात सुमारे २०० खास पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पाहुण्यांच्या निवासासाठी जेडब्ल्यू मॅरियट आणि फॉर्च्युन हॉटेलमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज या लग्नाला हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे.


लग्नातील भोजनासाठी प्रति ताट ६ हजार रुपयांहून अधिक खर्च केला जात आहे. यामध्ये विशेषतः उत्तराखंडच्या स्थानिक 'पहाडी' खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. मडुव्याची भाकरी, लाल तांदूळ, गहतची डाळ आणि झंगोरेची खीर यांसारखे पदार्थ पाहुण्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतील. लग्नानंतर १७ मार्च रोजी लखनौमधील 'द सेंट्रम' हॉटेलमध्ये एक भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.


कुलदीपने आपल्या लग्नासाठी मसुरीची निवड केली आहे. हॉटेल सवायमध्ये ८० खोल्या फक्त पाहुण्यांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. या लग्नाला क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लग्नातील मेजवानीही तितकीच खास असणार आहे. पहाडी जेवणासोबतच नाश्त्यामध्ये इडली-डोसा आणि छोले-भटूरे अशा पदार्थांची रेलचेल असेल. १४ मार्चला मसुरीमध्ये लग्न उरकल्यानंतर १७ मार्चला लखनौमध्ये ग्रँड रिसेप्शन पार्टी होणार आहे. लग्नाचे विधी १३ मार्चपासूनच सुरू होणार आहेत. ऑस्ट्रेलियात नोकरी करणारी वंशिका आता कुलदीपची 'लाईफ पार्टनर' बनून नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहे.

Comments
Add Comment

Vaibhav Sooryvanshi : वैभव सूर्यवंशीवर कारवाई होणार? बीसीसीआयने दिली मोठी अपडेट !

मुंबई : भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryvanshi) सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी

Telagana T20 League : टीसीएसने मोहम्मद सिराज,तिलक वर्मा आणि रायडू यांना बजावली कायदेशीर नोटीस

मुंबई : भारतीय संघातील स्टार खेळाडू मोहम्मद सिराज (Mohammad Siraj),तिलक वर्मा (Tilak Varma

Shreyanka Patil : टीम इंडियाला मोठा धक्का ! स्टार ऑल राउंडर स्पर्धेतून बाहेर ?

Mumbai : भारतीय महिला संघाने टी २० विश्वचषकात (Womens T20 World Cup 2026) दोन्ही सामने जिंकून दमदार सुरुवात केली आहे. मात्र,आता संघाला

FIFA WORLDCUP 2026 : 'हायड्रेशन ब्रेक' नियमावरून तज्ज्ञ आणि प्रशिक्षकांमध्ये मतभेद; खेळाडूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

लॉस एंजेलिस: फिफा विश्वचषक २०२६ मध्ये खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी फिफाने एक मोठा निर्णय घेत, सामन्यांदरम्यान

Nashik : नाशिकच्या क्रिकेटविश्वातील ‘जॉनी सर’ हरपले; माजी क्रिकेटपटू रमेश संवत्सरकर यांचे निधन

Nashik : नाशिकच्या क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. नाशिकचे ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रमेश संवत्सरकर

FIFA WORLDCUP 2026 : लुईस डियाझच्या झगमगाटात कोलंबियाची विजयी सुरुवात; उझबेकिस्तानचा ३-१ ने पराभव

मेक्सिको सिटी — २०२२ च्या कतार विश्वचषकाची संधी हुकल्यानंतर, कोलंबिया संघाने पुन्हा एकदा फुटबॉलच्या सर्वात