Telagana T20 League : टीसीएसने मोहम्मद सिराज,तिलक वर्मा आणि रायडू यांना बजावली कायदेशीर नोटीस

मुंबई : भारतीय संघातील स्टार खेळाडू मोहम्मद सिराज (Mohammad Siraj),तिलक वर्मा (Tilak Varma) आणि माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू (Ambati Rayudu) हे तिघेही आता मोठ्या अडचणीत सापडले आहेत.या तिघांना टीसीएसने नोटीस बजावली आहे. टीजी २० लीग'ची नोंदणी झालेली नसतानाही मोहम्मद सिराज, तिलक वर्मा आणि अंबाती रायडूने त्याची जाहिरात केली.यावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे.


नेमकं प्रकरण काय ?


मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा क्रिकेट असोसिएशनकडे टी- २० स्पर्धेची नोंदणी झालेली नाही. तरीही मोहम्मद सिराज, तिलक वर्मा आणि अंबाती रायडू या तीन भारतीय खेळाडूंनी लीगची जाहिरात आणि प्रमोशन केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) या खेळाडूंना या जाहिरातींसाठी तसेच प्रमोशनच्या कामांसाठी परवानगी मिळाली नव्हती. बीसीसीआयच्या नियमांनुसार, त्यांच्या परवानगी शिवाय कोणत्याही क्रिकेट लीगचे आयोजन करणे किंवा त्याचे प्रमोशन करणे हा नियमांचा भंग मानला जातो.या प्रकरणात केवळ क्रिकेटपटूच नाही, तर चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारही अडकले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि व्यंकटेश यांनीही या लीगचे प्रमोशन केले. त्यामुळे तेलंगणा क्रिकेट असोसिएशनने या दोन्ही अभिनेत्यांनाही नोटीस पाठवली आहे.


कारवाई होण्याची शक्यता ?


मोहम्मद सिराज,तिलक वर्मा किंवा अंबाती रायडू या तिघांपैकी कोणीही अद्याप संपूर्ण प्रकरणावर किंवा मिळालेल्या नोटीसवर प्रतिक्रिया दिलेला नाही. बीसीसीआयच्या परवानगीशिवाय लीगला प्रोत्साहन दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

Comments
Add Comment

IND vs SL 1st Test: मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये! श्रीलंकेच्या अनुभवी खेळाडूला दुखापत; गॉल टेस्टमध्ये नेमकं काय घडलं?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेच्या

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

IND vs SL Galle Test : भारतापाठोपाठ श्रीलंकाही पहिल्या डावात 'ऑलआऊट', जाणून घ्या गॉल कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे किती धावांची आघाडी ?

गॉल : पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोनल दिनुषाच्या पहिल्यावहिल्या कसोटी शतकानंतरही भारतीय

Ind vs SL Test Match : श्रीलंकेवर फॉलोऑनची टांगती तलवार : लंकेच्या ४६२ धावांत ५ गडी बाद; टीम इंडियाच्या विजयात पावसाचा अडथळा?

Ind vs SL Test Match : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

Cristiano Ronaldo : रोनाल्डोच्या निवृत्तीचे संकेत; २०२६-२७ हंगाम ठरू शकतो अखेरचा!

मुंबई : फुटबॉल विश्वातील महान खेळाडूंपैकी एक असलेला क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) लवकरच आपल्या २५ वर्षांच्या

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील