Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या मैत्रिणींच्या मानसिक छळाला कंटाळून जीवन संपवलं. पायल किशोर राजगुरू असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. ही घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली. याप्रकरणी पायलच्या तीन मैत्रिणींविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळं पायलच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



सुसाईड नोटमध्ये काय?


पोलिसांना तपासादरम्यान मृत पायलकडे सुसाईड नोट मिळाली.पायलने तिचे रुममेट्स आणि मैत्रिणींवर गंभीर आरोप केल्याचं या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. तिच्या मैत्रिणी तिचा सतत मानसिक छळ करायच्या, असं पायलने सुसाईड नोटमध्ये लिहिल्याची माहिती आहे. मृत पायलने सुसाईड नोटमध्ये आरोप केले आहेत की, तिच्या मैत्रिणी खूप दिवसांपासून तिचा मानसिक छळ करायच्या. समाजात बदनामी केल्याचा आरोपही तिने केला आहे. तसच आई-वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप पायलने केला आहे.या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून पायलने आयु्ष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं.


पायलच्या तीन मैत्रिणींविरोधात गुन्हा दाखल
चंदननगर पोलिसांनी सुसाईड नोट आणि कुटुंबियांच्या जबाबाच्या आधारावर कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी पायलच्या तीन मैत्रिणींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.सबुरी संतोष काले, शिवानी शाम आजबले आणि दिपाली अशी आरोपी तरुणींची नावे आहेत.

Comments
Add Comment

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या

दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जनगणना होणार; मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला संभ्रम दूर

मुंबई: एप्रिलपासून सुरु होत असलेली जनगणना पहिल्या टप्प्यातील असून यामध्ये केवळ घरगणना होत आहे. त्यामुळे