मुंबई: एप्रिलपासून सुरु होत असलेली जनगणना पहिल्या टप्प्यातील असून यामध्ये केवळ घरगणना होत आहे. त्यामुळे त्यामध्ये अनुसूचित जाती व जमाती वगळता इतर जातींच्या गणनेचा उल्लेख नाही.
जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जातीनिहाय जनगणना होईल. त्याची अद्याप केंद्राकडून अधिसूचना निघालेली नाही. मात्र त्या अधिसूचनेमध्ये सर्व जातींची गणना करण्याचा नमूद असेल. जातनिहाय जनगणना व्हावी, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. तसे केंद्राला राज्याकडून पुन्हा कळवले जाईल, असे सांस्कृतिक मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी बुधवारी अर्थसंकल्पावरील सामान्य प्रशासन विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेच्या उत्तरामध्ये सांगितले.