भारतीय तेलवाहक जहाजांचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास सुरू

तेहरान : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी फोनवरून चर्चा केली. यानंतर इराणने भारतीय तेलवाहक जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवासाकरिता आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले.


इराणने अमेरिका आणि इस्रायलसह पाश्चात्य देशांसाठी तेलवाहक आणि मालवाहक जहाजांची वाहतूक बंद केली आहे. पण भारताच्या तेलवाहक जहाजांना सुरक्षित प्रवासाकरिता आवश्यक ते सहकार्य करणार असल्याची घोषणा केली आहे.


पश्चिम आशियात २८ फेब्रुवारी २०२६ पासून अमेरिका आणि इस्रायल यांचे इराणशी युद्ध सुरू आहे. या युद्धाने आता तेराव्या दिवसांत प्रवेश केला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत तिसऱ्यांदा भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी फोनवरून चर्चा केली. ताज्या चर्चेअंती इराणने अमेरिका, युरोप आणि इस्रायलमधील जहाजांवर निर्बंध सुरू असतानाही, भारतीय तेलवाहक जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवासाकरिता आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले. यामुळे पुष्पक आणि परिमल या दोन भारतीय तेलवाहक जहाजांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळाली आहे.


रॉयटर्सच्या वृत्तानुसार भारतीय तेलवाहक जहाजांना संरक्षणाची हमी मिळाली असताना इतर देशांच्या तेलवाहक जहाजांवर इराणने हल्ले केले आहेत. आतापर्यंत किमान सहा तेलवाहक जहाजांवर हल्ले झाले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत झाला आहे. तेलाच्या आणि मालाच्या सागरी मार्गाने होणाऱ्या वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. भारताने आधीचे नियोजन केल्यामुळे देशासाठीची ७० टक्के तेल आयात ही होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या बाहेर आहे. यामुळे या आयातीला कोणताही धोका दिसत नाही. उर्वरित आयात जी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणार आहे त्यासाठी इराणने सुरक्षेची हमी दिल्यामुळे भारताची चिंता दूर होण्यास मदत झाली आहे.


याआधी २०१३ मध्ये इराणने भारताच्या देश शांती नावाच्या तेलवाहक जहाजाला अडवून २५ भारतीयांना अटक केली होती. तब्बल एक महिन्याच्या अथक प्रयत्नांनंतर आखाती देश आणि अमेरिकेच्या दबावामुळे इराणने जहाजाची तसेच भारतीयांची सुटका केली होती. याउलट २०२६ मध्ये इतर देशांची मालवाहक आणि तेलवाहक जहाजं संकटात असताना भारताच्या पुष्पक आणि परिमल या दोन तेलवाहक जहाजांना इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवासाकरिता आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले आहे.

Comments
Add Comment

Israel Attacks Lebanon : होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद; ट्रम्प अडचणीत? इस्रायलच्या कारवाईमुळे इराण आक्रमक

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात

Middle East War : इस्रायलचा लेबनॉनवर हल्ला; ८९ ठार, इराणचा अमेरिकेला थेट इशारा

तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा चिघळताना दिसत आहे. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठी

Attack on Iran's Lavan Island oil refinery : युद्धविरामानंतर काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला

तेहरान : युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला

Iran US War Ceasefire : १० कलमी अटी अन् बरंच काही...; 'इराणला उद्ध्वस्त करू' म्हणणारे ट्रम्प अचानक मवाळ का झाले ? नेमकी कोणाची खेळी ?

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या अमेरिका आणि इराणमध्ये (Iran US War Ceasefire) अखेर दोन

Iran US War Ceasefire : मोठी बातमी : अखेर युद्धाला 'पूर्णविराम'! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवडे शांततेचा करार

 डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा वॉशिंग्टन : गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराणमध्ये धुमसणारा संघर्ष अखेर

Pakistan : इराण-अमेरिका युद्धाचा पाकिस्तानला दणका; इंधनाचे दर भडकल्याने जनता रस्त्यावर, देशात 'एनर्जी लॉकडाऊन'!

इस्लामाबाद : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेजारील देश असलेल्या पाकिस्तानची झोप