एलपीजी सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करा, महसूलमंत्री बावनकुळेंचे निर्देश

मुंबई : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल हे दोन देश इराण विरुद्ध लढत आहे. या युद्धाने आता १२ व्या दिवसांत प्रवेश केला आहे. युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे होणारी आंतरराष्ट्रीय तेलवाहतूक मंदावली आहे. यामुळे अनेक देशांमध्ये तेलाची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने संपूर्ण देशात नैसर्गिक वायूसाठी 'अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५' लागू केला आहे. या कायद्यांतर्गत राज्यात एलपीजी सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.


आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती असल्याने, केंद्र सरकारने गॅस कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. या कायद्यानुसार, आता गॅस पुरवठ्याचे नियंत्रण पूर्णपणे सरकारच्या हातात आले आहे. सरकारने प्राधान्य क्षेत्र ठरवून दिले असून, त्यानुसारच गॅसचे वितरण करावे लागणार आहे. यात प्रामुख्याने घरगुती गॅस ग्राहक, सीएनजी, पीएनजी आणि रुग्णालयांसारख्या अत्यावश्यक सेवांना सर्वाधिक प्राधान्य आहे.


हा ऐतिहासिक निर्णय जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ च्या कलम ३ अंतर्गत घेण्यात आला आहे. या कायद्यामुळे सरकारला कोणत्याही वस्तूचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करण्याचे आपत्कालीन अधिकार प्राप्त होतात. विशेष म्हणजे, या काळात गॅस पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्यांवर किंवा साठेबाजी करणाऱ्यांवर सरकार 'एस्मा' अंतर्गत कठोर कारवाई करू शकते.


सरकारने घरगुती आणि अत्यावश्यक सेवांना प्राधान्य दिल्याने, काही मोठ्या औद्योगिक क्षेत्रांना मिळणाऱ्या गॅस पुरवठ्यावर मर्यादा आणल्या जाणार आहेत. युद्धाचा हा भडका जोपर्यंत शांत होत नाही, तोपर्यंत देशांतर्गत ऊर्जा व्यवस्थापन सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य पातळीवर राज्य शासनांच्या माध्यमातून अंमलबजावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात एलपीजी सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

Central Railway Block : कसारा मार्गावर १५ रात्रींचा ब्लॉक; टिटवाळा स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम

मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टिटवाळा स्थानकावरील

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

MPSC Exam : औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; आता फेरपरीक्षा होणार, उमेदवारांना पुन्हा अर्जाची गरज नाही

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या