एरंडोल येथे चार वर्षीय बालिकेवर आजोबांनी केला अत्याचार

जळगाव / एरंडोल – येथील लांडापूर भागातील चार वर्षीय बालिकेवर तिच्याच नातेवाईक असलेल्या ५९ वर्षीय मामे आजोबांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर संतप्त जमावाने संशयिताविरुद्ध कडक कारवाईच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.


अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांच्यासह एरंडोलचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, पारोळ्याचे निरीक्षक अशोक पवार, धरणगावचे निरीक्षक सुनील पवार, कासोद्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी संतप्त जमावाची समजूत काढली. संशयितास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


याबाबत माहिती अशी की, शहरातील लांडापूर भागात राहणारी चार वर्षीय बालिका दुपारी बारा वाजेच्या सुमारास आपल्या घरात आई व भावंडांसह खेळत होती. बालिकेची आई प्रातर्विधीसाठी गेल्यानंतर सुमारे पंधरा मिनिटांनी घरी परतली असता बालिका घरात आढळून आली नाही. त्यामुळे तिने मुलांसह आजूबाजूला चौकशी केली.


घराशेजारीच राहणारे बालिकेचे नात्याने मामे आजोबा असलेल्या नातेवाईकाकडे बालिकेची आई चौकशीसाठी गेली असता घराचा दरवाजा अर्धवट लावलेला दिसून आला. तिने त्यांच्याकडे बालिकेबाबत विचारणा केली असता त्यांनी मला माहिती नाही असे सांगितले. मात्र ते अर्धनग्न अवस्थेत दिसल्याने आईला संशय आला. तिथे तिची चार वर्षीय बालिका आढळून आली.


आईने बालिकेला घरी आणले आणि घडलेल्या घटनेची माहिती पतीला दिली. याबाबत बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संशयिताविरुद्ध पोक्सो (POCSO ACT) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सहाय्यक निरीक्षक शंकर पवार पुढील तपास करत आहेत. दरम्यान, चार वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना समजताच संशयिताविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, तसेच त्याला आमच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत शेकडो महिला व पुरुषांनी पोलीस स्थानक परिसरात गर्दी केली. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील कासोदा फाट्याजवळ रास्तारोको आंदोलन सुरू केले. उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्यासह हवालदार अनिल पाटील, आकाश शिंपी, पोपट सोनार, सचिन पाटील, दीपक पाटील आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन संतप्त जमावाची समजूत काढली व विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली. परिसरात शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या तसेच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये रंगणार चित्रपट महोत्सव

मुंबई: राज्य शासनाचा अधिकृत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पु. ल. देशपांडे

बिनविरोध नसला तरी सुनेत्राताईंना विक्रमी विजय मिळवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामतीकरांना आवाहन

बारामती: महाराष्ट्राच्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या

अमेरिकेच्या लष्कराने इराणमध्ये केला स्वतःच्याच विमानांवर हल्ला; कारण काय आणि किती नुकसान झाले?

नवी दिल्ली: अमेरिकेने इराणमधून आपल्या लढाऊ वैमानिकांना परत आणण्यासाठी एक जोखमीची बचाव मोहीम सुरू केली होती.

Goregaon News : गोरेगावात शोभायात्रेदरम्यान दोन गट भिडले; पोलिसांचा लाठीचार्ज, ८ जणांना अटक

मुंबई : काल गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये अचानक उसळलेल्या वादाने हिंसक

Iran-US-Israel War : ४५ दिवसांचा युद्धविराम होणार? अमेरिका - इराण एकमेकांच्या अटी मान्य करणार?

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता युद्धविराम (सीजफायर) होण्याची शक्यता व्यक्त केली जात

BJP Foundation Day : भाजप स्थापना दिनाच्या पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि योगींनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले ...

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या ४७व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह