ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आता देशात 'एस्मा' कायदा लागू करण्यात आला आहे.


मध्य आशियातील वाढत्या तणावाचे पडसाद आता भारताच्या इंधन पुरवठ्यावर उमटू लागले आहेत. एलपीजी सिलिंडर आणि पेट्रोलियम उत्पादनांची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने आजपासून (मंगळावर १० मार्च) संपूर्ण देशात 'एस्मा' म्हणजेच 'अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा' लागू केला आहे. याचबरोबर युद्धजन्य परिस्थितीमुळे जेव्हा एखाद्या वस्तूचा पुरवठा विस्कळीत होतो, तेव्हा बाजारात त्या वस्तूची साठेबाजी आणि काळाबाजार वाढण्याची शक्यता असते. हे रोखण्यासाठी सरकार या कायद्याचा आधार घेते.



काय आहे 'एस्मा' कायदा ?


या कायद्यामुळे इंधन पुरवठ्याशी संबंधित असलेले कर्मचारी आता कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा संपावर जाऊ शकणार नाहीत. यामुळे गॅस आणि पेट्रोलचा पुरवठा विस्कळीत होणार नाही याची खात्री सरकारला करता येईल. सरकार कोणत्याही वस्तूचा साठा, वितरण आणि विक्रीवर मर्यादा घालू शकते. सध्या एलपीजी बाबत हेच घडत आहे. व्यापारी किंवा विक्रेते जास्त नफ्यासाठी गॅस सिलिंडरचा साठा करून ठेवू शकत नाहीत. तसे आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होतो. सरकार जीवनावश्यक वस्तूंची कमाल विक्री किंमत निश्चित करू शकते, जेणेकरून टंचाईच्या काळात ग्राहकांची लूट होणार नाही.



अत्यावश्यक सेवांचा दर्जा :


एलपीजी वितरण, पेट्रोल पंप आणि तेल कंपन्यांच्या कामाला 'अत्यावश्यक सेवा' म्हणून घोषित करण्यात आले आहे. कामावर येण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर या कायद्यांतर्गत कठोर कारवाई किंवा अटक केली जाऊ शकते. युद्धामुळे कच्च्या तेलाची आवक कमी झाली असताना, देशांतर्गत उपलब्ध असलेल्या साठ्याचे वितरण समान पद्धतीने व्हावे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.



जनतेवर काय परिणाम होणार?


सरकारने हा निर्णय सामान्य जनतेच्या सोयीसाठी घेतला आहे, जेणेकरून रुग्णालये आणि घरगुती वापरासाठी लागणारा गॅस वेळेवर उपलब्ध होईल. मात्र, टंचाईच्या अफवा पसरवून साठेबाजी करणाऱ्यांवरही आता सरकारची करडी नजर असणार आहे. तेल कंपन्यांना इतर उत्पादने कमी करून केवळ एलपीजी उत्पादनावर भर देण्याचे आदेश या कायद्यांतर्गत दिले गेले आहेत.

Comments
Add Comment

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार

Sabarimala Temple Case : सबरीमला मंदिर प्रवेश प्रकरणात केंद्र सरकारने मांडली स्पष्ट भूमिका; म्हणाले...

केरळमधील सबरीमला मंदिराबाबत (Sabarimala Temple Case) केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली. केंद्र