गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पातील बाधितांना या महिना अखेरपर्यंत कांजुरमार्गला मिळणार घरे

मुंबई: बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमार्फत गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या रस्ते विकास प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या निवासासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कांजूर (पश्चिम) येथे ‘बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प’ अंतर्गत सुमारे १० हजार ५० चौरस मीटर क्षेत्रफळावरील ७ इमारतींमध्ये ९०६ सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. पैकी २ इमारतींचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून २५२ प्रकल्प बाधितांचे मार्च २०२६ अखेरपर्यंत पुनर्वसन करावे. उर्वरित सदनिकांचे बांधकाम ठरलेल्या वेळेत पूर्ण करावे. जेणेकरून, त्या लवकरात लवकर प्रकल्पबाधितांना सुपूर्द करता येतील. तसेच, प्रकल्पाच्या ठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प’ अंतर्गत कांजूर (पश्चिम) येथे गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात येत असलेल्या सदनिकांची अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी ६ मार्च २०२६ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. नगर अभियंता रामचंद्र कदम, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्प हा एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे बाधित नागरिकांच्या निवासासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कांजूर (पश्चिम) येथे सुमारे १०,०५० चौरस मीटर क्षेत्रफळावर ७ इमारती बांधण्यात येत आहेत. यामध्ये, तळमजला + २३ मजल्यांच्या इमारतींचा समावेश आहे. या ५ इमारतींमध्ये प्रकल्पबाधितांसाठी एकूण ९०६ सदनिका बांधण्यात येत आहेत. प्रत्येक सदनिकेचे क्षेत्रफळ ३०० चौरस फूट असून त्यामध्ये बैठक, शयनकक्ष (संलग्नित स्वच्छतागृह), स्वयंपाकघर यांचा समावेश आहे. तसेच, प्रकल्पाच्या परिसरात बाजार, सामुदायिक सभागृह, वाचनालय, आरोग्य केंद्र, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) आदी सुविधाही पुरवण्यात येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर, बांधकामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी बांगर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यामध्ये सदनिकांच्या आतमधील संरचना; पाणी, स्वच्छतागृह, वीज, उद्वाहन (लिफ्ट), पायऱ्या, अग्निसुरक्षाविषयक उपाययोजना आदींची गुणवत्ता तसेच त्यासंबंधित महत्त्वपूर्ण बाबींची त्यांनी अत्यंत बारकाईने पाहणी केली आणि एकंदर प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले.

सदनिकांचे बांधकाम योग्यप्रकारे आणि दर्जेदारपणे सुरू आहे. तथापि, याठिकाणी वास्तव्यास येणाऱ्या प्रकल्पबाधित नागरिकांसाठी अन्य आवश्यक सोयीसुविधांचीही विहित वेळेत पूर्तता करावी. तसेच, सदनिकांचे बांधकाम ठरलेल्या वेळेत पूर्ण करुन या सदनिका त्यांना लवकरात लवकर उपलब्ध करुन दिल्या जातील, यासाठी योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही बांगर यांनी यावेळी दिल्या.


बांगर म्हणाले की, गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प टप्पा ३ अंतर्गत जून २०२६ पासून बोगदा खनन संयंत्राद्वारे भूमिगत बोगद्यांच्या खोदकामास सुरुवात केली जाणार आहे. तत्पूर्वी, अमर नगर येथे लॉन्चिंग शाफ्टचे काम सुरु होणे अपेक्षित आहे. त्यासाठी जागेची आवश्यकता आहे. अमर नगर येथील प्रकल्प बाधितांचे कांजूर (पश्चिम) येथे पुनर्वसन केले जाणार आहे. पात्र कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी ७ इमारतींमध्ये सुमारे ३०० चौरस फुटांच्या सदनिकांची उभारणी करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्त नागरिकांना सुरक्षित व सन्मानजनक निवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा पुनर्वसन उपक्रम राबविण्यात येत आहे. या गृहनिर्माण संकुल परिसरात अंतर्गत रस्ते, मोकळी जागा आणि आवश्यक नागरी सुविधा विकसित करण्यात येत आहे. २ इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून मार्च २०२६ अखेरपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात २५ सदनिका उपलब्ध होतील. तर, उर्वरित ५ इमारतींना एप्रिल २०२६ अखेरपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळणे अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचे बांगर यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

बहुप्रतिक्षित गारगाई धरणाच्या कामाला गती; तब्बल १.२ मेगावॅटर वीज निर्मिती प्रकल्पही उभारणार

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाला आता गती देण्यात येणार असून या धरण प्रकल्पाच्या कामासाठी

विक्रोळी,भांडुप-मुलुंडच्या एस अँड टी प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या साक्षी दळवी

मुंबई: ‘एस आणि ‘टी' प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत चक्क पुन्हा एकदा उबाठाला मोठा धक्का बसला

सोशल मीडियावर महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणे भोवणार

गृहमंत्रालयासोबत समन्वय साधून कठोर कारवाईचे मंत्री आदिती तटकरे यांचे संकेत मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून

कंत्राटदारांकडून वेळेत बस न मिळाल्याने मुंबईत 'बेस्ट'चा तुटवडा

राज्यमंत्र्यांची कबुली; स्क्रॅपिंग पॉलिसीचाही बेस्टला मोठा फटका मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करणार

-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणार मुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र

बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपनीचा तात्पुरता परवाना रद्द..-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : मुंबई व आसपासच्या भागात वाढत असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर