महाराष्ट्रात दोन अर्ज बाद ठरल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होणारी निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली आहे. गुरुवारी दाखल झालेल्या नऊ अर्जांपैकी दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद ठरल्याने सात जागांसाठी सातच उमेदवार रिंगणात उरले. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह सातही नेत्यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.


या निवडणुकीत संख्याबळानुसार भाजपला ४, तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. उमेश म्हात्रे आणि कांते सायन्ना या दोन अपक्ष उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यांच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदकांच्या सह्या नसल्याने छाननीमध्ये हे दोन्ही अर्ज बाद ठरवण्यात आले. त्यामुळे ही निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली.


भाजपने यंदा राज्यसभेत राज्यातील महत्त्वाच्या समाजघटकांना प्रतिनिधीत्व दिले आहे. नागपूरच्या माजी महापौर राहिलेल्या माया इवनाते या भाजपचा राज्यातील महत्त्वाचा आदिवासी चेहरा आहेत. त्या अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाच्या सदस्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या निवडीतून भाजपने विदर्भातील आदिवासी मतांचे समीकरण साधले आहे. तर, धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे रामराव वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. विधान परिषदेचा अनुभव गाठीशी असलेल्या वडकुते यांच्या रूपाने भाजपने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील धनगर समाजाला साद घातली आहे.


आठवलेंची हॅट्ट्रिक


पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणारे विनोद तावडे यांना अपेक्षेप्रमाणे राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रमुख रामदास आठवले यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आठवले हे सलग तीनवेळा राज्यसभेवर पोहोचले आहेत.

Comments
Add Comment

इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणच्या वीज प्रकल्पावर बुशेहर अणुकेंद्रावर मोठा हल्ला; एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत इराणसोबतच्या युद्धात ऐतिहासिक नुकसान सोसल्यानंतर, अमेरिका आणि इस्रायलने

भोंदूबाबा अशोक खरातने हवालाद्वारे पाच देशांत पाठवले हजारो कोटी?, रोहित पवारांचा गंभीर आरोप

मुंबई : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी कोठडीत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्याभोवतीचा चौकशीचा फास अधिक

Pratap Sarnaik : रिक्षा परवान्यांसाठी आता 'मराठी' सक्तीची

मागील १० वर्षांतील परवान्यांची होणार सखोल फेरतपासणी; १ मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे परिवहन मंत्र्यांचे

बाकी उठाठेव सोडून संजय राऊत यांनी स्वत:च्या पक्षात काय चालले ते पाहावे; भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई: अशोक खरात यांच्या तपासासंदर्भात अंजली दमानिया यांना मिळत असलेला तपशील मुख्यमंत्री कार्यालयातून लिक होत

Pakistan: पाकिस्तानला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार?; संयुक्त अरब अमिरातीकडून २ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करण्याची मागणी

नवी दिल्ली: आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या पाकिस्तानला आणखी एक विनाशकारी बातमी मिळाली आहे. संयुक्त अरब अमिरातीने (UAE)

Devendra Fadnavis: 'बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी'

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात राजकीय मतभेद बाजूला ठेवून बारामती विधानसभा मतदारसंघाची