​नवापूर जमीन घोटाळ्याचे 'रॅकेट' फोडणार, बावनकुळेंचे आश्वासन

तलाठ्यापासून वरपर्यंत सर्वांची 'एसआयटी' चौकशी; महसूलमंत्री बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा


मुंबई : नंदूरबार जिल्ह्यातील मौजे गंगापूर (ता. नवापूर) येथील जमीन संपादनात झालेला भ्रष्टाचार आणि बक्षीस पत्राच्या आधारावर नियमांचे उल्लंघन करून झालेले फेरफार या प्रकरणाची 'एसआयटी'मार्फत सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधान परिषदेत केली. या प्रकरणात तलाठ्यापासून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत कोणाचीही गय केली जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले. चर्चेत आमदार भाई जगताप आणि प्रवीण दरेकर या सदस्यांनीही सहभाग घेतला. या प्रकरणातील तांत्रिक बाबींवर बोट ठेवताना महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले की, "जमीन कुणाला बक्षीस म्हणून दिली जाऊ शकते, याचे काही नियम आहेत. मात्र, या प्रकरणात मूळ जमीन मालक आणि बक्षीस घेणारे यांच्यात कोणताही कौटुंबिक किंवा कायदेशीर ताळमेळ बसत नाही. असे असतानाही महसूल विभागाने हे बक्षीस पत्र कसे स्वीकारले आणि त्यावर फेरफार कसे केले, याची चौकशी होणे गरजेचे आहे. यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असून सुरुवातीपासूनच मोठी गडबड झाली आहे."


आदिवासींच्या जमिनींबाबतचा 'तो' आदेश रद्द करणार


चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, "आदिवासींच्या जमिनींबाबत कलम ३६ (२) रद्द करण्याचा जो आदेश दिला गेला आहे, तो चुकीचा पायंडा पाडू शकतो. हे आदेश रद्द करण्यासाठी सरकारकडे असलेल्या 'पुनर्विलोकन' अधिकाराचा वापर केला जाईल. जर काही तांत्रिक अडचणी आल्या, तर राज्य सरकार तातडीने उच्च न्यायालयात अपील दाखल करेल, जेणेकरून भविष्यात अशा प्रकरणांचा आधार घेऊन आदिवासींच्या जमिनी हडपल्या जाणार नाहीत."

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी मान्सून पुन्हा जोर

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा

Alexandra Cinema in Nagpada : नागपाड्यातील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची ओळख कायमचीच मिटणार

- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई

FDA Action on Blinkit : FDAचा ब्लिंकिटवर मोठा दणका! मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित; झुरळे, अस्वच्छता अन् नियमभंग उघड

मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली