आयएएस अधिकारी देवेंद्र सिंह यांचे निलंबन मागे

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी आयएएस अधिकारी देवेंद्र सिंह यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी ब्रीफिंगसाठी वारंवार बोलावूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी याबाबतचे पुरावे सादर केल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात येत असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत दिली.


चंद्रपूरमधील आमदारांनी पर्यावरणासंदर्भात मागील गुरुवारी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री पंकजा मुंडे यांना तत्काळ उत्तर देता आले नाही. त्यांनी सभागृहात सांगितले की, संबंधित अधिकाऱ्याला याबाबत पूर्वकल्पना देऊन ब्रीफिंगसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांनी ब्रीफिंग दिले नाही आणि वारंवार बोलावूनही ते उपस्थित राहिले नाहीत. तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी या बाबीची गंभीर दखल घेत तत्काळ निलंबनाचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी सामान्य प्रशासन विभागाकडून अतिरिक्त सचिव व्ही. राधा यांच्या सहीने आदेश जारी करण्यात आला. अखिल भारतीय सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६९ मधील नियम ३(१)(a) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मात्र, याबाबत सिंह यांनी अनुपस्थिती बाबतचे पुरावे सादर केल्यानंतर निलंबन मागे घेण्यात आले आहे.


संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत याचबाबतची माहिती देताना सांगितले की, आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी पुरावे सादर करत घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन तत्काळ मागे घेण्यात यावे आणि त्यांच्या पदावर त्यांना रुजू करण्यात यावे, असा प्रस्ताव मांडत आहे.

Comments
Add Comment

सोशल मीडियावर महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणे भोवणार

गृहमंत्रालयासोबत समन्वय साधून कठोर कारवाईचे मंत्री आदिती तटकरे यांचे संकेत मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून

महाराष्ट्रात दोन अर्ज बाद ठरल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होणारी निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली आहे. गुरुवारी

इंधन तुटवड्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गांधी परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी देशाची बदनामी थांबवावी मुंबई : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या

कंत्राटदारांकडून वेळेत बस न मिळाल्याने मुंबईत 'बेस्ट'चा तुटवडा

राज्यमंत्र्यांची कबुली; स्क्रॅपिंग पॉलिसीचाही बेस्टला मोठा फटका मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या

हुंडाबंदी कायदा अधिक कठोर होणार, राज्यमंत्री पंकज भोयरांनी दिली ग्वाही

मुंबई : गेल्या काही वर्षांत राज्यात घडलेल्या हुंडाबळी प्रकरणांचा मुद्दा सोमवारी विधानसभेत चांगलाच गाजला.

​नवापूर जमीन घोटाळ्याचे 'रॅकेट' फोडणार, बावनकुळेंचे आश्वासन

तलाठ्यापासून वरपर्यंत सर्वांची 'एसआयटी' चौकशी; महसूलमंत्री बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा मुंबई : नंदूरबार