अभिषेक शर्माने नॉकआउटमध्ये विक्रमी अर्धशतकासह रचला इतिहास

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : अभिषेक शर्माने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील नॉकआउटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकून आपल्या टीकाकारांना बॅटनं उत्तर दिले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यावर भारतीय संघावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आली. सूर्यकुमार यादवनं कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरत असल्याचे सांगत अभिषेक शर्मावर भरवसा कायम दाखवला. त्यानेही संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवत फायनलमध्ये विक्रमी खेळी साकारली. १८ चेंडूत अर्धशतक साजरे करत त्याने नॉकआउटमधील सर्वात जलद अर्धशतक ठोकले.


याआधी फिन ॲलन याने ईडन गार्डन्सच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात १९ चेंडूत अर्धशतक ठोकून हा विक्रम केला होता. पण आता हा विक्रम अभिषेकच्या नावावर आहे, ज्याने संपूर्ण स्पर्धेत संघर्ष केल्यानंतर अंतिम फेरीसाठी आपले सर्वोत्तम अर्धशतक झळकावले. अभिषेकने यंदाच्या हंगामातील सर्वात जलद अर्धशतकही नोंदवले.


टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम हेनरिक क्लासेन यांच्या नावावर होता. त्याने २०२४ मध्ये बार्बाडोसमध्ये भारताविरुद्ध २३ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. अभिषेक शर्मासाठी ही स्पर्धा भयावह स्वप्नासारखी राहिली. अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध सलग तीन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर त्याला संघाबाहेर करा, अशी मागणी झाली. पण शेवटी याच पठ्ठ्याने नॉकआउटमधील सर्वात जलद अर्धशतक झळावण्याचा पराक्रम करुन दाखवला.

Comments
Add Comment

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या

Bangladesh Cricket Board : बांगलादेश क्रिकेट बोर्डात खळबळ, तीन संचालकांचा राजीनामा

बांगलादेश क्रिकेट बोर्डात (बीसीबी) गोंधळाचे वातावरण आहे. ढाका येथे झालेल्या प्रदीर्घ संचालक मंडळाच्या