'भारतीय क्रिकेट संघाचा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद'

मुंबई : टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या संदेशात म्हणाल्या की, भारतीय संघाने संपूर्ण टी-२० विश्वचषक स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, संघभावना आणि समर्पित खेळभावना ही संपूर्ण देशातील क्रीडाप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे.


या ऐतिहासिक विजयामुळे देशभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले असून भारताचा तिरंगा जगभर अभिमानाने फडकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय संघाने भविष्यातही अशीच दमदार कामगिरी करत देशाचे नाव जागतिक क्रीडा क्षेत्रात अधिक उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य