भारतातील पहिल्या खासगी व्यावसायिक रॉकेट विक्रम १ चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील स्पेसटेक स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसच्या इन्फिनिटी कॅम्पसचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. तसेच पंतप्रधान मोदींनी भारताच्या पहिल्या व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेट, विक्रम-१ चे उद्घाटन केले. हे रॉकेट उपग्रहांना पृथ्वीजवळच्या लो अर्थ ऑर्बिट (LEO) अर्थात लिओमध्ये घेऊन जाईल.


हैदराबादमधील २ लाख चौरस फूट जागेवर पसरलेल्या इन्फिनिटी सुविधेत दरमहा एक ऑर्बिटल रॉकेट तयार करण्याची क्षमता आहे. तसेच स्पेसटेक ही कंपनी प्रक्षेपण वाहनांच्या डिझाइन पासून निर्मिती आणि चाचणी पर्यंतची सर्व कामं करण्यास तत्पर आहे.


स्कायरूटचे इन्फिनिटी कॅम्पस हे भारताच्या नवीन विचारसरणीचे, नवोपक्रमाचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे युवाशक्तीचे प्रतिबिंब आहे. आपल्या युवाशक्तीची नवोपक्रम, जोखीम घेण्याची क्षमता आणि उद्योजकता नवीन उंची गाठत आहे; असे पंतप्रधान मोदी उद्घाटनपर कार्यक्रमात म्हणाले. येणारा काळ भारताचा, त्याच्या तरुणांचा आणि नवोन्मेषाचा आहे आणि येत्या पाच वर्षांत देश आपली प्रक्षेपण क्षमता नवीन उंचीवर नेईल. भारत जागतिक उपग्रह प्रक्षेपण परिसंस्थेत एक नेता म्हणून उदयास येईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. भारतातील अभियंते, उच्च दर्जाचे उत्पादन परिसंस्था, जागतिक दर्जाचे प्रक्षेपण स्थळे आणि नाविन्यपूर्ण मानसिकता यामुळे आपली अंतराळ क्षमता किफायतशीर आणि विश्वासार्ह आहे, म्हणूनच जगाला भारताकडून खूप अपेक्षा आहेत; असे पंतप्रधान मोदींनी भाषणातून ठामपणे सांगितले.


जागतिक कंपन्या भारतात उपग्रह बांधू इच्छितात, भारताकडून प्रक्षेपण सेवा घेऊ इच्छितात आणि भारतासोबत तंत्रज्ञान भागीदारी करू इच्छितात. भारताचे अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक ठिकाण बनत आहे; असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. भारताच्या अंतराळ प्रवासाला नवीन पंख देण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) भूमिकेचे त्यांनी कौतुक केले आणि सांगितले की या क्षेत्राने राष्ट्रीय सुरक्षेसह सर्व क्षेत्रांमध्ये पायाभूत भूमिका बजावली, ज्यामुळे सरकारने ऐतिहासिक अवकाश सुधारणा हाती घेतल्या आणि अवघ्या सहा ते सात वर्षांत त्यात परिवर्तन घडवून आणले, असे सांगत मोदींनी इस्रोचे जाहीर कौतुक केले. जगात लहान उपग्रहांची मागणी सतत वाढत आहे, प्रक्षेपण वारंवारता देखील वाढत आहे, नवीन कंपन्यांनी उपग्रह सेवा देण्यास सुरुवात केली आहे. येत्या काळात जागतिक अंतराळ अर्थव्यवस्था वाढणार आहे आणि भारतातील तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे; असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.



विक्रम १ विषयी थोडक्यात महत्त्वाचे



  1. हैदराबादच्या स्कायरूट एरोस्पेसने बनवलेले हे भारतातील पहिले खासगी व्यावसायिक रॉकेट

  2. विक्रम साराभाई यांच्या नावाचा संदर्भ असलेले विक्रम-१ हे २०२६ च्या सुरुवातीला पृथ्वीच्या कक्षेत पहिले उड्डाण करेल.

  3. तब्बल सात मजली उंच असलेल्या या रॉकेटमध्ये एकाच मोहिमेत अनेक उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता

  4. परवडणाऱ्या दरात पृथ्वीच्या विविध कक्षांमध्ये ३५० किलोग्रॅम पर्यंतचे उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता

  5. भारतातील पहिले प्रक्षेपण वाहन आहे जे पूर्णपणे कार्बन फायबरपासून बनवल्यामुळे वजनाला हलके पण कामगिरीच्या बाबतीत प्रभावी

  6. विक्रम-१ मध्ये ३डी-प्रिंटेड हायपरगोलिक इंजिन

  7. प्रगत कार्बन कंपोझिट वापरून बनवलेली कलाम-१२०० बूस्टर स्टेज भारतातील सर्वात मोठी खासगीरित्या विकसित केलेली रॉकेट स्टेज

Comments
Add Comment

भारताचा शेषनाग १५० ड्रोन, नवं घातक शस्त्र

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे ड्रोनचे महत्त्व आणखी वाढले आहे. याआधी रशिया - युक्रेन लढाईत

Crude Oil Purchases : भारताच्या कच्च्या तेलाच्या खरेदीत वाढ; आफ्रिकेसह अमेरिका, रशिया आणि लॅटिन अमेरिकेतून कच्च्या तेलाची खरेदी वाढली

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि होर्मुज जलसंधीतून जाणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर

Attack on Saudi Arabia : सौदी अरेबियावरील हल्ल्यात कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही; अफवांवर विश्वास ठेऊ नका

- भारतीय दूतावासाने दिली माहिती इराणने रविवारी (८ मार्च) सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात

हा फक्त राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून

इराण-इस्त्रायल संघर्षानंतर ५२ हजारांहून अधिक भारतीय मायदेशी

नवी दिल्ली : इराण-इस्त्रायल संघर्षानंतर पश्चिम आशियातील काही देशांमध्ये हवाई क्षेत्र अंशतः पुन्हा सुरू

'तेल खरेदीसाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही'

रशियाकडून खरेदीबाबत भारत ठाम नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जिथे मिळेल तिथून कमीत कमी किमतीत तेल खरेदी करेल.