नितीश कुमारांचा मुलगा निशांत कुमारांचा ऐन पन्नाशीत JDU मध्ये प्रवेश

पाटणा : बिहारमध्ये एक मोठी राजकीय घटना घडली आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल संयुक्त अर्थात जेडीयूचे (Janata Dal United or JDU) अध्यक्ष नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार याने पक्षप्रवेश करत राजकीय कारकि‍र्दीचा शुभारंभ केला. आता नितीश कुमार ७५ वर्षांचे झाले आहेत तर त्यांचा मुलगा निशांत कुमार ५० वर्षांचा आहे. पन्नाशीत जेडीयूमध्ये प्रवेश करणारा निशांत लवकरच महत्त्वाची राजकीय जबाबदारी हाताळणार असल्याची चर्चा आहे.


नितीश कुमार यांनी बिहारमधून जेडीयूच्या तिकिटावर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. राज्यसभेवर खासदार झाल्यानंतर नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. यानंतर निशांत कुमार बिहारमध्ये महत्त्वाची राजकीय जबाबदारी हाताळणार असल्याचे वृत्त आहे.


नितीश कुमारांनी राजीनामा दिल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या बिहारचे सरकार विसर्जित होईल. यानंतर जेडीयू आणि भाजपच्या आमदारांच्या बैठका होतील. बिहारसाठी नवा मुख्यमंत्री निवडला जाईल. नव्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये निशांत कुमार उपमुख्यमंत्री हे पद स्वीकारणार असल्याची चर्चा आहे.


सक्रीय सदस्य म्हणून वडिलांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून काम करणार असल्याचे निशांत कुमार म्हणाले. नितीश कुमारांचा राज्यसभेवर जाण्याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असेही निशांत कुमार यांनी सांगितले.


कोण आहेत निशांत कुमार ?


निशांत यांचा जन्म २० जुलै १९७५ रोजी झाला. ते नितीश कुमार आणि दिवंगत मंजू सिन्हा यांचे एकुलते एक पुत्र आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या निशांत यांनी रांची येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (BIT), मेसरा येथून शिक्षण पूर्ण केले. ते पन्नाशीत पोहोचल्यावर राजकारणात पदार्पण करत आहेत.


नितीश कुमार काय म्हणाले ?


संसदेच्या दोन्ही सभागृहांचे (लोकसभा व राज्यसभा) आणि राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे (विधानसभा व विधानपरिषद) सदस्य होण्याची इच्छा होती. आतापर्यंत लोकसभा खासदार, विधानसभा आमदार, विधानपरिषद सदस्य ही सर्व पदं हाताळून झाली आहे. फक्त राज्यसभेत सदस्य म्हणून कधी गेलो नव्हतो. ही इच्छा आता पूर्ण करून घेत असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषद या चार सभागृहांचे सदस्य राहिलेल्या बिहारच्या नेत्यांमध्ये लालूप्रसाद यादव आणि सुशीलकुमार मोदी आहेत. या यादीत आता नितीश कुमार यांचाही लवकरच समावेश होणार आहे.

Comments
Add Comment

Palghar News : मोखाड्यात १८ वर्षीय तरुणाला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप; २२ महिलांविरोधात गुन्हा

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा येथे १८ वर्षीय तरुणाला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा

Nashik News : कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ९ हजार ७३१ शेतकऱ्यांना दिलासा

Nashik News : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना

Nashik : कांद्याची दिल्लीवारी ! लासलगावहून ८४० टन कांदा दिल्लीला रवाना होणार

Nashik : देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र

Toxic Movie : 'टॉक्सिक' सिनेमा कसा आहे ? यशचा स्वॅग भारी, पण 'केजीएफ'सारखी जादू चालणार का ?

मुंबई : 'केजीएफ २'च्या (KGF 2) अफाट यशाने अख्ख्या जगाला वेड लावणारा साऊथ सुपरस्टार यश (Yash) तब्बल चार वर्षांनंतर पडद्यावर

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे