आयसीसी स्पर्धांमधील ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी भारत मोडीत काढणार

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्डकप २०२६ चा अंतिम सामना रविवारी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात गतविजेता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे. भारताने इंग्लंडचा, तर न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. या दोन संघापैकी कोणता संघ वर्ल्ड कप उंचवणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघ मैदानावर उतरताच एक मोठा इतिहास रचणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांनी आयसीसी स्पर्धांमध्ये प्रत्येकी १४ वेळा फायनल खेळली आहे. या आयसीसी स्पर्धांमध्ये वनडे वर्ल्डकप, टी-२० वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा समावेश आहे. रविवारी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर तो हा विक्रम मोडणार आहे. भारतीय संघ आयसीसी स्पर्धांमधील आपला १५ वा अंतिम सामना खेळणार आहे. असे असले तरी ऑस्ट्रेलियाने १४ पैकी १० फायनल जिंकल्या आहेत. तर भारताने १७ पैकी ७ फायनल जिंकल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी २००२ ची फायनल ही पावसामुळे रद्द करण्यात आली होती.


आयसीसी फायनलमध्ये सर्वाधिक फायनल खेळणारे संघ




  1. ऑस्ट्रेलिया - १४ सामने  - १० विजय

  2. भारत - १४ सामने - ७ विजय

  3. वेस्ट इंडिज - ८ सामने ५ विजय

  4. इंग्लंड - ९ सामने ३ विजय

  5. श्रीलंका - ७ सामने ३ विजय

  6. न्यूझीलंड - ७ सामने २ विजय

  7. पाकिस्तान - ६ सामने ३ विजय

  8. दक्षिण अफ्रिका - ३ सामने २ विजय


आयसीसी टूर्नामेंटच्या फायनलमध्ये भारताचे विजय




  1. वनडे विश्वचषक १९८३: भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला.

  2. चॅम्पियन्स ट्रॉफी २००२: भारत आणि श्रीलंका संयुक्त विजेते.

  3. टी-२० विश्वचषक २००७: भारताने पाकिस्तानला मात दिली.

  4. वनडे विश्वचषक २०११: भारताने श्रीलंकेचा पराभव केला.

  5. चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३: भारताने इंग्लंडला धूळ चारली.

  6. टी-२० विश्वचषक २०२४: भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवले.

  7. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: भारताने न्यूझीलंडचा पराभव केला.

Comments
Add Comment

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या

Bangladesh Cricket Board : बांगलादेश क्रिकेट बोर्डात खळबळ, तीन संचालकांचा राजीनामा

बांगलादेश क्रिकेट बोर्डात (बीसीबी) गोंधळाचे वातावरण आहे. ढाका येथे झालेल्या प्रदीर्घ संचालक मंडळाच्या