मुंबईतील ३४ मालमत्तांधारकांकडे सुमारे ५४९ कोटींची थकबाकी; ई लिलाव प्रक्रिया सुरु होताच ५ जणांनी भरली १० कोटींच्या कराची रक्कम

मुंबई: मालमत्ताकर थकविणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात महानगरपालिकेने कठोर पावले उचलत जप्ती व लिलाव कारवाई सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने एकूण ३४ मालमत्तांना ई - लिलाव प्रक्रिये अंतर्गत दीर्घ मुदतीची नोटीस जारी केली आहे. या ३४ थकबाकीदार आस्थापनांकडे दंड रकमेसह एकूण ५४८ कोटी ६९ लाख ८२ हजार ४८७ रुपये इतकी मोठी थकबाकी प्रलंबित आहे. यापैकी दीर्घ मुदतीच्‍या नोटीसीची कालमर्यादा संपलेल्‍या ११ मालमत्तांची प्रत्‍यक्ष लिलाव प्रक्रिया करताच यातील ५ मालमत्‍ताधारकांनी १० कोटी ४५ लाख रूपयांचा थकीत कर भरणा केला. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी मोठ्या थकबाकीदारांच्या नाक दाबण्याचा केलेला प्रयत्न आता यशस्वी होताना दिसत आहे.


महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या स्पष्ट निर्देशांनुसार तसेच सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कराची प्रभावी वसुली करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


मालमत्‍ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणा-या मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तेचा ई लिलाव केला जाणार आहे. त्‍यात सी विभागात मीनोचर माणिकशाॅ गांधी व व्‍ही.डी. शहा यांच्‍या नावे असलेली संमिश्र मालमत्‍ता (थकबाकी रक्‍कम २ कोटी २४ लाख ४३ हजार ९२२ रूपये), ,एफ दक्षिण विभागात लमण रघुनाथ शेट्टी यांच्‍या नावे असलेला भूखंड (थकबाकी रक्‍कम ८९ लाख १५ हजार ९८८ रूपये), एच पश्चिम विभागात भिकाभाई एन उपाध्‍याय व श्रीराम जे. भट यांच्‍या नावे असलेली व्‍यावसायिक मालमत्‍ता (थकबाकी रक्‍कम १८ कोटी ८८ लाख १३ हजार ३७६ रूपये), पी उत्‍तर विभागात बच्‍चुभाई डब्‍ल्‍यू डी शॉ अॅण्‍ड कंपनी यांच्‍या नावे असलेले व्‍यावसायिक शेड (थकबाकी रक्‍कम ३ कोटी २३ लाख ३ हजार ९३८ रूपये), पी दक्षिण विभागात मेसर्स अमीर पार्क अॅण्‍ड अॅम्‍युझमेंट पार्क यांच्‍या नावे असलेले हॉटेल (थकबाकी रक्‍कम ३४ कोटी ५५ लाख ६५ हजार ४९९ रूपये), ई विभागात जयंत ऑईल मिल यांच्‍या नावे असलेली तेल गिरणी व गोदाम (थकबाकी रक्‍कम ०१ कोटी ४१ लाख ९१ हजार ०८० रूपये), आर उत्‍तर विभागात विकयलाल इन्‍व्‍हेंस्‍टमेंट यांच्‍या नावे असलेला भूखंड (थकबाकी रक्‍कम ०२ कोटी ४१ लाख ७९ हजार ३२९ रूपये), डी विभागात सरदार सईदना ताहीर सैफुदीन साहेब यांच्‍या यांच्‍या नावे असलेले रूग्‍णालय (थकबाकी रक्‍कम २१ कोटी ०३ लाख ३६ हजार ७५२ रूपये), डी विभागात सरदार सईदना ताहीर सैफुदीन साहेब यांच्‍या यांच्‍या नावे असलेली व्‍यावसायिक मालमत्‍ता (थकबाकी रक्‍कम १३ कोटी ४७ लाख ८६ हजार २४५ रूपये), एच पश्चिम विभागात सुमेर असोसिएट्स यांच्‍या नावे असलेला मोकळा भूखंड (थकबाकी रक्‍कम १८८ कोटी ४६ लाख २४७ रूपये), एस विभागात राजहंस असोसिएट्स यांच्‍या नावे असलेली व्‍यावासायिक मालमत्‍ता (थकबाकी रक्‍कम ४७ कोटी ०२ लाख ९९ हजार ६८७ रूपये), आर दक्षिण विभागात जीवनश्रद्धा कॉ - ऑपरेटीव्‍ह हाऊसिंग सोसायटी यांच्‍या नावे असलेला मोकळा भूखंड (थकबाकी रक्‍कम ६४ लाख २९ हजार ४६१ रूपये) आणि ई विभागात सुमेर बिल्‍ट कॉर्पोरेशन प्रायव्‍हेट लिमिटेड यांच्‍या नावे असलेला मोकळा भूखंड (थकबाकी रक्‍कम ८५ कोटी ३८ लाख ७८ हजार १८५ रूपये) आदींचा समावेश आहे.


या सर्व थकबाकीदारांना कर भरणा करण्‍यासाठी २१ दिवसांची दीर्घ नोटीस बजाविण्‍यात आली आहे. या मुदतीत कर भरणा न केल्‍यास विहित कार्यपद्धतीनुसार, लिलाव प्रक्रिया सुरू केली जाईल असे अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Brazil Adventure Jump Video: ब्रिज स्विंगचा थरारक! सुरक्षा दोर न बांधताच तरुणीला हवेत सोडले; 21 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू

ब्राझील: ब्राझीलमध्ये (Brazil) एका साहसी खेळादरम्यान झालेल्या भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. ब्रिज स्विंगवरून उडी

Women T20 world cup 2026 IND vs PAK : भारताविरुद्धच्या महासंग्रामाआधी पाकिस्तानला मोठा धक्का! कर्णधार फातिमा सना दुखापतग्रस्त, खेळण्याबाबत साशंकता

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला १२ जूनपासून दमदार सुरुवात झाली असून क्रिकेटप्रेमींचे लक्ष आता भारत आणि

Reserve Bank Of India (RBI) : RBI ची मोठी कारवाई! पैसे काढण्यावर घातली मर्यादा, खातेदारांनी हे जाणून घ्या...

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India - RBI) महाराष्ट्रातील मोगावीरा सहकारी बँकेवर (Mogaveera Co-operative Bank) मोठी कारवाई केली

Monsoon Update : मान्सूनची महाराष्ट्राला प्रतीक्षा! एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

Monsoon Update : राज्यात वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून सर्वांचे लक्ष आता मान्सूनकडे (Monsoon) लागले आहे. मात्र जून

Pune Fraud News : MBBS प्रवेशाच्या आमिषाने विद्यार्थ्यांची कोट्यवधींची फसवणूक; ऑर्थर रोड कारागृहातून रचला कट?

पुणे : वैद्यकीय शिक्षण (Medical Education) घेऊन डॉक्टर (Doctor) होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत मोठ्या

BMC News : मुंबईत १,१२४ दुकानांना मराठीतील फलकांची ऍलर्जी

महिनाभरात ३५ हजारांहून अधिक दुकानांच्या तपासणीतून झाले उघड मुंबई : मराठी भाषेतील नामफलक सक्तीच्या