राजस्थानमधील डॉ. अनुज अग्निहोत्री पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी टॉपर!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल शुक्रवारी (६ मार्च) जाहीर केला. या निकालात अनुज अग्निहोत्री यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. ‘यूपीएससी’च्या नागरी सेवा परीक्षेतून हे देशातील सर्वोच्च अधिकारी निवडले जातात. याची लेखी परीक्षा ऑगस्ट २०२५ मध्ये घेण्यात आली होती, तर मुलाखती डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडल्या होत्या. या दोन्ही टप्प्यांच्या आधारे आयोगाने एकूण ९५८ उमेदवारांची विविध केंद्रीय सेवांसाठी शिफारस केली आहे. अनुज हा मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थी आहे. अनुज अग्निहोत्री हा राजस्थानमधील रावतभाटा या छोट्या शहरातील रहिवासी आहे. एमबीबीएस झाल्यानंतर अनुजने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याऐवजी लोकप्रशासनाचा मार्ग निवडला आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश संपादन केले आहे. या परीक्षेच्या टॉप १० मध्ये अनुज अग्निहोत्री, राजेश्वरी सुवे, आकांश धुल, राधव झुनझुनवाला, इशान भटनागर, जीनिया अरोरा, एआर राजा मोहद्दीन, पक्षल सेक्रेटरी, आस्था जैन आणि उज्ज्वल प्रियांक यांचा समावेश आहे.


महाराष्ट्राचे मानकरी


निकालातील पहिल्या १०० क्रमांकांत राज्यातील उमेदवारांनी स्थान प्राप्त केले आहे. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, किरण कामठे यांनी ५३वा, हृषिकेश अलासे यांनी ६१वा, सायली पगार यांनी ८७वा, दीक्षा पाटकर यांनी ८८वा क्रमांक पटकावला आहे, तर अंकिता पाटील यांनी १४०, कार्तिक बच्छाव यांनी १७७, राहुल पाटील यांनी २२५, शुभम बेहेरे यांनी २२६, ऋषिकेश पालीमकर यांनी २८३, मोहिनी जगताप यांनी ३२३, हर्षवर्धन पाटील यांनी ३४९, हर्षवर्धन तिडके यांनी ३५५, कुणाल अहिरराव यांनी ४३०, अभिषेक मगदूम यांनी ४४९, धनश्री अहिरे यांनी ४८९, तर मनोज पाटील यांनी ४९३वा क्रमांक मिळवला आहे.

Comments
Add Comment

Dadar-Ratnagiri passenger : दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल पुन्हा दादर स्थानकापर्यंत करा; खासदार रविंद्र वायकर यांची मागणी

- शक्य असल्यास ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तारित करा - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरातील चेंगराचेंगरी प्रकरणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नालंदा: बिहारमधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी

मुंबई: बिहारमधील नालंदा येथे एक मोठी घटना घडली आहे. शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आठ जणांचा

CCTV Certification Rules: १ एप्रिलपासून अनेक चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विक्रीवर बंदी; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मुंबई: भारतातील सीसीटीव्ही बाजारपेठेत मोठे बदल होणार आहेत. भारत इंटरनेट-कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचे

नितीश यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय खळबळ; कोण होणार मुख्यमंत्री?

नवी दिल्ली: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी ते राज्यसभेवर

Jobs Alert : १२ वी नंतर विमानतळावर करिअरची मोठी संधी; लाखोंचं पॅकेज आणि हाय-प्रोफाईल लाईफस्टाईल, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : सध्याच्या काळात विमान वाहतूक (Aviation) क्षेत्र हे जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगांपैकी एक