अमिताभ यांची अयोध्येत मालमत्ता खरेदी

अयोध्या : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत मालमत्ता खरेदी केली आहे. त्यांनी ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’कडून २.६७ एकर जमीन खरेदी केली आहे. या व्यवहाराची किंमत ३५ कोटी रुपये आहे. कंपनीने ६ मार्च रोजी ही माहिती दिली आहे. ही जमीन ७५ एकरच्या ‘द सरयू’ प्रकल्पाजवळ स्थित आहे. अभिनंदन लोढा ग्रुपसोबत अमिताभ यांचा हा चौथा रिअल इस्टेट प्रकल्प आहे. अमिताभ यांनी अयोध्येत यापूर्वी, मे २०२५ मध्ये त्यांनी ‘द सरयू’ जवळच ४० कोटी रुपयांना २५ हजार चौरस फुटांचा एक भूखंड खरेदी केला होता. २०२४ मध्ये त्यांनी याच प्रकल्पात १४.५ कोटी रुपयांना १० हजार चौरस फुटांचा भूखंड घेतला होता. मंदिर शहरात त्यांनी आतापर्यंत जमिनीवर ९० कोटी रुपये खर्च केले आहेत.
Comments
Add Comment

मराठी रंगभूमीवर आता चालणार 'दाभोळकरी पॅटर्न'; 'कॅरी ऑन स्पायगिरी' मधून भरत दाभोळकर यांचा धमाका!

मुंबई: अनेक दशके इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे, 'हिंग्लिश' नाटकांचे प्रणेते आणि

Ranveer Singh : प्रसिद्ध कलाकार होण्यापूर्वी रणवीरसोबत घडला 'हा' घृणास्पद प्रकार

- रणवीरलाही सामोर जावं लागलं 'कास्टिंग काउच'ला मुंबई : बॉलिवूडमध्ये नवख्या कलाकारांना या इंडस्ट्रीत काम

Bigg Boss Marathi 6 : बीग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची तारीख ठरली ?

मुंबई : बीग बॉस मराठी ६ सीजन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सीजनची जोरदार चर्चा रंगली असल्याचे पाहायला

सुरु होणार भक्तीचं महापर्व; संत सखुबाई घेणार जलसमाधी

मुंबई : ‘सन मराठी’वरील ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक अत्यंत भावनिक आणि थरारक भाग पाहायला

Sonalee Kulkarni Manjula song : मंजुळा गाण्यातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी महाराष्ट्राची अप्सरा सज्ज

मुंबई : प्रेक्षकांच्या मनावर अप्सरा म्हणून राज्य करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता हटके आणि नव्या अंदाजात

Cup Bashi Movie : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार सासू-सुनेची 'ही' कमाल जोडी, 'कप बशी' सिनेमाचं पोस्टर रिलीज

सासू आणि सुनेचं नातं म्हटलं की प्रेम, आदर राग तर कधी रुसुवे फुगवे अशा संमिश्र भावना येतात. लवकरच या नात्यातील एक