FIFA World Cup 2026 : ऐतिहासिक घटना, एलॉय रूमने ९० मिनिटांत केले १५ सेव्ह ! इक्वेडोरला धक्का !!

मिसूरी : फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये छोट्याशा कॅरिबियन देश कुरासाओने इतिहास रचला आहे. इक्वेडोरसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध 0-0 अशी बरोबरी साधत कुरासाओने पहिला गुण मिळवला आहे. या ऐतिहासिक निकालाचा खरा नायक ठरला तो गोलरक्षक एलॉय रूम, ज्याने तब्बल 15 अप्रतिम सेव्ह करत इक्वेडोरचा प्रत्येक हल्ला निष्फळ ठरवला.


37 वर्षीय एलॉय रूमने संपूर्ण सामन्यात भिंतीसारखे उभे राहून गोलपोस्टचे रक्षण केले. इक्वेडोरने सामन्यात 27 शॉट्स मारले, त्यापैकी अनेक सुवर्णसंधी होत्या. मात्र रूमने एकापेक्षा एक सरस बचाव करत प्रतिस्पर्धी संघाला गोल करण्यापासून रोखले. विशेष म्हणजे त्याच्या 15 सेव्हपैकी 10 सेव्ह पेनल्टी बॉक्सच्या आतून आलेल्या प्रयत्नांवर होते.सामन्याच्या सुरुवातीलाच इक्वेडोरचा अनुभवी स्ट्रायकर एनर व्हॅलेन्सिया गोल करण्यासाठी जवळ पोहोचला होता. मात्र रूमने योग्य दिशेने झेप घेत शानदार बचाव केला. दुसऱ्या हाफमध्येही मोइसेस कैसेडो आणि व्हॅलेन्सिया यांच्या धोकादायक प्रयत्नांवर त्याने अप्रतिम प्रतिक्रिया देत सामना गोलशून्य ठेवला.


या कामगिरीसह एलॉय रूम विश्वचषक इतिहासातील अविस्मरणीय गोलरक्षकांच्या यादीत सामील झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 1966 पासून सेव्हची नोंद ठेवली जात आहे. त्या काळापासून एका सामन्यात सर्वाधिक 16 सेव्ह करण्याचा विक्रम अमेरिकेच्या टिम हॉवर्डच्या नावावर आहे. रूमने 15 सेव्ह करत त्या विक्रमाच्या अगदी जवळ मजल मारली आहे. विशेष म्हणजे हॉवर्डला 16 सेव्हसाठी 120 मिनिटे लागली होती, तर रूमने ही कामगिरी केवळ 90 मिनिटांत केली.


या बरोबरीनंतर ग्रुप-ई मधील समीकरणे अधिक रंजक झाली आहेत. याच दिवशी जर्मनीने आयव्हरी कोस्टचा 2-1 असा पराभव केल्याने जर्मनीने नॉकआऊट फेरीतील स्थान निश्चित केले. दुसरीकडे, इक्वेडोरची स्थिती कठीण झाली असून आता त्यांना अखेरच्या सामन्यात जर्मनीविरुद्ध विजय मिळवणे जवळपास अनिवार्य झाले आहे.सामन्यानंतर एलॉय रूम म्हणाला, हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. गोलरक्षक म्हणून हा जवळपास परिपूर्ण सामना होता. आता कुरासाओमध्ये माझा पुतळा उभारायला हवा! कुरासाओचा हा ऐतिहासिक गुण आणि एलॉय रूमची अविश्वसनीय कामगिरी विश्वचषक 2026 मधील सर्वात मोठ्या प्रेरणादायी कथांपैकी एक ठरली आहे.

Comments
Add Comment

Shivpal Singh : भालाफेकपटू शिवपाल सिंगवर १० वर्षांची बंदी

नवी दिल्ली : टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा ३१ वर्षीय भालाफेकपटू शिवपाल सिंग याच्यावर

Hockey World Cup : उपांत्य फेरीच्या मार्गात भारतासमोर नेदरलँड्सचे कडवे आव्हान

अम्स्टेलवीन : एफआयएच हॉकी विश्वचषक बेल्जियम-नेदरलँड्स 2026 च्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय पुरुष आणि महिला संघांसमोर

BWF World Championships : त्रिसा-गायत्रीची ऐतिहासिक कामगिरी; 15 वर्षांनंतर भारताचे महिला दुहेरीत विश्वविजेतेपदाचे पदक निश्चित

नवी दिल्लो : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीने बीडब्ल्यूएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत

IND vs SL Test : कोलंबोच्या मैदानात पुन्हा इतिहास रचण्याची जय्यत तयारी; १६ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने झळकावले होते ऐतिहासिक द्विशतक!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक कसोटी मालिकेचा दुसरा सामना २३ ऑगस्टपासून कोलंबो येथील प्रसिद्ध सिंहलीज

BPL suffers : बीपीएलला ३१ कोटींचा फटका! यंदा स्पर्धा रद्द होण्याची शक्यता; भारत-बांगलादेश मालिकेच्या वेळापत्रकातही बदलाचे संकेत

बांगलादेश क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) अध्यक्ष तमीम इक्बाल यांनी

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.