बेस्टच्या चालकांची सेवा महापालिका घेणार; उसणवारी तत्वावर तब्बल १०० चालकांच्या हाती स्टेअरींग

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बेस्टला कायमच मदतीचा हात दिला जात असतानाच आता ही मदत अधिक चांगल्याप्रकारे करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. यामध्ये बेस्टचे जे चालक सध्या कार्यरत नाहीत, अशा बस चालकांची सेवा महापालिकेने उसणवारी तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १०० बेस्टच्या चालकांची उसणवारी तत्वावर सेवा घेण्यासाठी महापालिकेने बेस्टला कळवले असून यासंदर्भात प्रत्येक बस आगारांमधून चालकांकडून अर्ज लिहून घेत त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या चालकांची सेवा महापालिकेच्या कचरा वाहनांसह रुग्णवाहिकांसाठी व इतर वाहनांसाठी घेतली जाणार आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने बेस्ट प्रशासनाला पत्र लिहून एक वर्षांच्या उसणवारी तत्वावर तत्वावर १०० बस चालकांची सेवा घेण्याची मागणी केली आहे. या १०० बस चालकांची सेवा माहपालिकेच्या कचरा वाहून नेणारी वाहने, बसेस, रुग्णवाहिका, टेम्पाे, डंपर आदींवर तीन पाळ्यांमध्ये घेतली जाणार आहे. यासाठी सेवा घेण्यासाठी बेस्ट उपक्रमाला प्रस्ताव दिला असून याबाबत प्रत्येक आगारांमध्ये आता उपक्रमाच्यावतीने फलक लावून चालकांना सूचना दिल्या असून त्यानुसार अर्ज भरुन घेण्यात येत आहे.


त्यामुळे सेवा ज्येष्ठतेनुसार विद्यमान स्थितीत प्रत्यक्ष बसगाडीवर काम करणाऱ्या ज्या बस चालकांना उर्वरीत सेवा कालावधी १८ महिने अथवा अधिक असेल अशा कर्मचाऱ्यांकडून संमतीपत्र भरुन घेण्यात येत आहे.


महापालिकेच्या मागणीनुसार बेस्ट उपक्रमाच्या विविध आगारांमध्ये फलक लावून बस चालकांना आवाहन करून त्यांच्याकडून संमतीपत्र लिहून घेतली जात आहे.


महापालिकेतील २१ प्रशासकीय कार्यालयांमध्ये कचरा उचलण्यासाठी मनुष्यबळासह वाहनांचा पुरवठा करण्यासाठी कंत्राट कंपनीची निवड केली आहे. तर एम पूर्व, एम पश्चिम आणि एल विभाग या तीन प्रशासकीय विभागांमध्ये महापालिकेच्या वाहनांसह मनुष्यबळासह कचरा उचलून डम्पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावली जाणार आहे. या तिन्ही विभागांमध्ये तीन पाळ्यांमध्ये वाहनांची सेवा देताना खासगी चालकांची सेवा घेण्याऐवजी महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी बेस्टच्या राखीव तथा अतिरिक्त चालकांची सेवा उसणवारी तत्वावर घेण्याची सूचना केली. त्यानुसार बेस्टच्या १०० चालकांची सेवा उसणवारी तत्वावर घेवून त्यांचा पगार महापालिकेच्या तिजोरीतून दिला जाणार आहे. त्यामुळे या १०० चालकांच्या पगाराचा भार बेस्टच्या तिजोरीव न पडता याची रक्कम बेस्टला वळती केली जाणार आहे.

Comments
Add Comment

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे

जमीन मोजणी होणार आता सुपरफास्ट, प्रत्येक जिल्ह्यात खाजगी भूमापकांची नियुक्ती

मुंबई : जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील

IRCTC पूर्ण करणार प्रवाशांची काश्मीर ते गोवा फिरण्याची संधी, जाणून घ्या माहिती

मुंबई : फिरण्याची इच्छा असते, पण वेळ आणि बजेटमुळे अनेकदा प्लॅन पुढे ढकलला जातो. अशा प्रवाशांसाठी Indian Railway Catering and Tourism

एप्रिलमध्ये तब्बल इतके बँक हॉलिडेज, ही सुट्ट्यांची यादी जाहीर

मुंबई : एप्रिल महिन्यात कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर बाहेर गावी जायच्या आधी बँक हॉलिडेज नक्की तपासून

इंधन संकटकाळात भारताची श्रीलंकेला मदत; पंतप्रधान मोदींचे केले आभार व्यक्त

मुंबई : इंधन पुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जात असलेल्या श्रीलंकेच्या मदतीच्या हाकेला भारताने तत्काळ प्रतिसाद

आयपीएलमधून ऐनवेळी माघार घेणाऱ्या क्रिकेटपटूंवर कठोर कारवाईची गावस्करांची मागणी

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही एक अशी लीग आहे, ज्यात खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण