Iran Israel Conflict Affect In India: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचला, नेमकं काय झालं?

दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून सध्या पश्चिम आशियात परिस्थिती तणावपूर्ण आहे. युद्धात इराणमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली असून आतापर्यंत १४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.


इराण हा जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. युद्ध अधिक भडकल्यास, पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होऊन, त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते आणि याचाच परिणाम आता भारतामध्ये जाणवू लागला आहे. इराण, अमेरिका, इस्रायल युद्धाच्या झळा आता भारतापर्यंत पोहोचल्या आहेत.



पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद


युद्धाच्या झळा आता भारतापर्यंत पोहोचवू लागल्या आहेत. इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेतील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागल्याने व्यवसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा कालपासून थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरगुती वापराचा गॅस पुरवठा लोकांना व्यवस्थित होत रहावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे. पुण्यातील बीपीसीएलच्या शिक्रापूर इथल्या प्लांटमध्ये आणि चाकणमधील एचपीसीएलच्या प्लांटमध्ये व्यावसायिक वापराचे सिलेंडर देणं बंद करण्यात आलं आहे. डीलर्सनी व्यवसायिक वापराच्या सिलेंडर्ससाठी गाड्या पाठवू नयेत अशा सुचना त्यांना देण्यात आल्या आहेत.



तेल कंपन्यांचा डीलर्सना नेमका मेसेज काय?


प्रिय डिलर्स, युद्धजन्य परिस्थितीमुळं कमर्शियल वापराचा गॅस पुरवठा थांबवण्यात येत आहे. सिलेंडर्स घेऊन जाण्यासाठी पुढील सूचनेपर्यंत कृपया गाड्या पाठवू नका. परिस्थिती सुधारली की लगेच कळवले जाईल.



व्यावसायिक वापराचा सिलेंडर कुठे वापरतात?


हॉटेल्स, कॅफे, धाबा, केटरिंग सर्विसेस आणि रेस्टॉरंट्स
बेकरी,मिठाईची दुकाने वगैरे
हॉस्पिटल्स आणि ऑफिस कँटीन्स
सेरॅमिक्स, वस्त्रोद्योग, धातू वितळवणारे, पावडर कोटिंग करणारे कारखाने



इराणवरील हल्ल्याचे कारण काय?


२०२५ मध्ये इराण-इस्त्रायल युद्ध आणि इराण समर्थित गटांशी झालेल्या संघर्षांमुळे इस्त्रायच्या नेत्यांनी जानेवारीमध्ये इराणला वारंवार इशारा दिला होता की, ते त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतांचा अनियंत्रित विस्तार करू देणार नाहीत. परंतु, इराणने अशा कोणत्याही गोष्टींना जुमानले नाही. इराणने आपला संवेदनशील अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र संबंधित प्रक्रिया सुरूच ठेवल्या. अनेकदा इशारे देऊनही इराण थांबत नाही, असे दिसताच इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला चढवला, ज्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तिपत्र  मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

Crime News : यवतमाळ हादरले! अर्धवट जळालेल्या 'त्या' तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं; पहिला गळा आवळला अन् मृतदेह जाळून....

यवतमाळ : जोडमोहा शिवारातील तासलोट जंगलात १५ दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह

Jyoti waghmare : ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, ते राज्य काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंनी 'साहेब' म्हटले, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंचा घणाघात

नांदेड : राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी शिवसेना

निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे, तसेच निश्चित कालावधीत पीएनजी सेवांचा विस्तार करणेबाबत दिल्लीत बैठक संपन्

राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी आर्थिक पाठबळ

Deccan Queen : ९६ वर्षांची 'दख्खनची राणी' नटली, सोफा सेट, वार्ली आर्ट अन्...डायनिंग डब्याचं नूतनीकरण; मुंबई-पुणेदरम्यानचा रॉयल प्रवास

मुंबई : मुंबई आणि पुणे दरम्यान धावणारी रेल्वेची शान, म्हणजेच 'डेक्कन क्वीन' (दख्खनची राणी), आता ९६ वर्षांची झाली

Weather Update : हवामानाचा ‘डबल अटॅक’! मुंबईत उकाड्याचा कहर तर विदर्भात वादळी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात हवामानाने अचानक कोंडी केली असून एका बाजूला मुंबई (Mumbai) मध्ये उकाड्याने अक्षरशः घामाच्या धारा सुरू