अरबी समुद्रात वाऱ्यांनी बदलली दिशा, मार्च हीटचा चटका, पावसाबाबत काय अंदाज?

मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हवामानाने कूस बदलली आहे. उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टरबन्स सक्रिय झाली असला तरी, त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही. उलट, राज्याच्या तापमानात मोठी वाढ होण्याचे संकेत मिळत असून मार्च हीटचा चटका आता अधिक तीव्र होऊ लागला आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत जाणवणार असून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



राज्यातील तापमानाची सद्यस्थिती



महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आता कमाल तापमानाचा पारा 37 डिग्रीच्या आसपास पोहोचला आहे. विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. जळगाव, धुळे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्ये सूर्याचा प्रखर ताप जाणवत आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर देखील आर्द्रतेचे प्रमाण वाढत असून घामामुळे नागरिक हैराण होत आहेत.


सध्याच्या हवामानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दिवसाचे आणि रात्रीचे तापमान यातील प्रचंड तफावत. दिवसा पारा ३५ अंशांच्या वर जात असताना रात्री आणि पहाटे मात्र हवामानात गारवा जाणवत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत किमान तापमान १६ अंश सेल्सियसच्या आसपास आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात सुमारे १५ ते १७ अंशांचा फरक असल्याने सर्दी, खोकला आणि तापासारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.


स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि कोकण विभागात मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात समुद्री वारे उशिरा येत असल्यामुळे दिवसा उष्णता जास्त राहील. किनारपट्टीच्या भागात उकाडा वाढल्यामुळे उष्णतेचा त्रास अधिक जाणवेल. तापमान ३७ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, धुळे या जिल्ह्यांमध्ये दक्षिण-पूर्व वाऱ्यांमुळे उष्णता अधिक राहील. दिवसा घराबाहेर पडताना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतील.



विदर्भ मराठवाड्यात काय स्थिती?



विदर्भ आणि मराठवाड्यात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पारा ३७°C पार जाण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यादेवीनगरमध्ये हवामान पूर्णपणे कोरडे आणि गरम राहील.दक्षिण महाराष्ट्रात सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या भागातही तापमानाचा कल वाढता आहे. येथे पावसाची कोणतीही शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली नाही.



पावसाची शक्यता कुठे?



महाराष्ट्रात संपूर्ण आठवडाभर कोरड्या हवामानाचा अंदाज असला तरी, दक्षिण भारतात केरळच्या काही भागात तिरुवनंतपुरम आणि कोल्लम हलक्या स्वरुपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र ४ ते ८ मार्च दरम्यान कुठेही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला नाही. महाराष्ट्रात आता उन्हाळा खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. कोरड्या हवामानामुळे पाण्याची पातळी खालावण्याची शक्यता असून दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळलेले बरे. पुढील ४८ तासांत तापमानात आणखी १ ते २ अंशांची वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment

11th Admission Special Round : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची विशेष फेरी सुरु; संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न

CM Devendra Fadnavis : शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्प

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कापूस,सोयाबीन,तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा व मका पिकनिहाय शेतकऱ्यांची करणार

Tragedy in Chhatrapati Sambhajinagar : मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचाही मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील दुर्घटनेने हळहळ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि दुःखद घटना समोर आली आहे. मोबाईल

CM Devendra Fadnavis : केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी खर्चात शालेय शिक्षण विभाग अव्वल

- ९६ टक्के निधीचा विनियोग; कृषी, ग्रामीण विकास आणि महिला-बाल विकास विभागांचीही उल्लेखनीय कामगिरी मुंबई : केंद्र

Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय! ३७४ हेक्टर जमिनीवरील ‘महाराष्ट्र शासन राखीव वने’ नोंद कायम

ठाणे : भाईंदरपाडा (ओवळे) येथील तब्बल ३७४ हेक्टर ७९ आर वनजमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादात

CM Devendra Fadnavis : ‘सीएसआर’ निधीच्या वापरासाठी राज्यात स्थापन होणार ‘महा सीएसआर प्राधिकरण’

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणार मुंबई : महाराष्ट्रात कॉर्पोरेट सामाजिक