मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये एफ दक्षिण आणि एफ उत्तर या प्रभाग समितीमध्ये नाट्यमयरित्या निकाल लागला. उबाठाकडे जाणारी प्रभाग समिती आता महायुतीकडे आली. या प्रभाग समितीमध्ये उबाठाच्या उमेदवार श्रध्दा जाधव यांचा विजय निश्चित मानला जात असतानाच शिवसेनेचे महापालिका गटनेते अमेय घोले तसेच माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी उबाठाच्या उमेदवार श्रध्दा जाधव यांचा पराभव करत शिवसेनेच्या मानसी सातमकर यांना विजय मिळवून दिला.


मुंबई महापालिकेच्या सहा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या. त्यात तीन ठिकाणी बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीमध्ये सी अँड डी प्रभाग समिती अध्यक्षपदी आकाश पुरोहित, आर उत्तर व आर मध्य प्रभाग समिती अध्यक्षपदी प्रकाश दरेकर आणि आर दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदी लिना देहेरकर यांचा समावेश होता. ए, बी आणि ई प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्यावतीने ज्ञानराज निकम आणि भाजपचे रोहिदास लोखंडे यांच्यात लढत होती. या प्रभाग समिती निवडणुकीत निकम यांना ७ तर प्रतिस्पर्धी उमेदवार रोहिदास लोखंडे यांना ५ मते मिळाली. ‘पी पूर्व’ आणि ‘पी पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार हैदरअली शेख हे १० मते मिळवून निवडून आले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे उमेदवार अजित रावराणे यांना ८ मते मिळाली. या प्रभागात भाजप ६, शिवसेना १ अशा प्रकारे महायुतीचे ७ सदस्य आहेत. तर उबाठा ५, काँग्रेस ४, मनसे एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) १ अशाप्रकारे सदस्य आहे. त्यामुळे महायुतीसोबत अजित रावराणे गेल्यामुळे त्यांचे संख्याबळ ८ असून काँग्रेस, मनसे, उबाठाचे १० एवढे संख्याबळ होत आहे. एफ दक्षिण' व ‘एफ उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत नाट्यमय निकाल लागला. या प्रभागात महायुतीचे ८ आणि उबाठा, मनसे, काँग्रेस आणि सपाचे मिळून ९ सदस्य संख्या असल्यामुळे महायुतीचा उमेदवार मानसी सातमकर यांचा पराभव निश्चित मानला जात होता. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार उबाठा नगरसेविका श्रध्दा जाधव यांचा विजय निश्चित मानला जात होता. यासाठी उबाठासह मनसेचे नगरसेवक फेटा बांधून सभागृहात दाखलही झाले होते. परंतु पहिल्या १५ मिनिटांमध्ये उमेदवारी मागे घेण्याच्या कालावधीमध्ये काँग्रेसच्या नगरसेविका आयेशा वणू आणि सपाच्या नगरसेविका इरम सिध्दीकी या सभागृहात पोहोचल्याच नाही. यामुळे पिठासीन अधिकारी रितू तावडे यांनी प्रभाग समिती अध्यक्षपदी मानसी सातमकर यांना विजयी घोषित केले.


विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाने प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उबाठाच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा दिला होता आणि या प्रभागात नगरसेविका आयेशा वणू यांना व्हिपही लागू केला होता. परंतु पक्षादेश डावलून आयेशा वणू या अनुपस्थित राहिल्याने शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना महापालिका गटनेते अमेय घोले आणि माजी नगरसेवक मंगेश सातमकर हे किंगमेकर ठरले आहे. विशेष म्हणजे श्रध्दा जाधव यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्या पक्षातील काही नगरसेवकही नाराज होते. या नाराजीचा फायदा महायुतीला उठवता आला असे बोलले जात आहे. या सहा पैंकी ‘आर मध्य‘ आणि ‘आर उत्तर’; ‘आर दक्षिण’; ‘पी पूर्व’ आणि ‘पी पश्चिम’ या तीन प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उप महापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले, तर शहरातील तीन प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत महापौर रितू तावडे यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. या निवडणुकीनंतर माध्यमांशी बोलतांना शिवसेनेचे महापालिका गटनेते अमेय घोले यांनी, शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय झाला आणि श्रध्दा जाधव यांचा पराभव केल्याचे सांगतानाच महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचा अविश्वास होता म्हणून त्यांची अनुपस्थिती लागली हे यावरून दिसून आल्याचे सांगितले. महायुतीचा विजय झाला आहे, महाविकास आघाडीत विश्वास राहिलेला नाही, संवाद राहिलेला नाही, याचा प्रत्यय प्रभाग समिती दिसून आला. उद्या तो राज्यात दिसून येईल आणि परवा केंद्रातही दिसून येईल,असा विश्वास घोले यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

स्थायी समितीतील ‘अंडरस्टँडिंग’ला पूर्णविराम; भाजपची सत्ता येताच यापूर्वीच्या भ्रष्टाचाराला आमंत्रण देणाऱ्या अनिष्ठ प्रथा करणार बंद

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत (स्टॅंडिंग कमिटी) यापुढे कोणतेही ‘अंडरस्टँडिंग’ खपवून घेतले जाणार

MHADA App: म्हाडाच्या मोबाईल ॲपचा शुभारंभ; आता सर्व सेवा फक्त एका क्लिकवर

मुंबई: सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र अधिकारिणीने (म्हाडा) आता

मुंबईत ऑनलाइन दहशतवादी प्रचार नेटवर्कचा पर्दाफाश; अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला अटक, एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासे

मुंबई: महाराष्ट्रातील कथित दहशतवादी कारवायांशी संबंधित एका ऑनलाइन नेटवर्कबाबत दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एक

बेस्टच्या चालकांची सेवा महापालिका घेणार; उसणवारी तत्वावर तब्बल १०० चालकांच्या हाती स्टेअरींग

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बेस्टला कायमच मदतीचा हात दिला जात असतानाच आता ही मदत अधिक चांगल्याप्रकारे

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत मंत्रिमंडळ बैठक; काय निर्णय झाला?

मुंबई: मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींवर करावयाच्या

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी