Ashok Hande : ‘मराठी बाणा’चे निर्माते अशोक हांडे यांना कार्यालयात घुसून थेट बॅटने मारलं; नेमकं काय घडलं?

मुंबई : 'मराठी बाणा' या सुप्रसिद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी संस्कृती जगभरात पोहोचवणारे लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक अशोक हांडे यांच्यासोबत एक भीषण घटना घडली आहे. गाडी पार्किंगच्या हप्त्यावरून धमकी देत त्यांना मारहाण करण्यात आली आहे. माहीम पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.



नेमकं घडलं काय ?


ही घटना १ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास माटुंगा पश्चिम येथील मनमाला टँक रोडवरील युनायटेड हाऊस इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या ‘चौरंग–मराठी बाणा’ या अशोक हांडे यांच्या कार्यालयात घडली.


महिम पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, प्रथमेश पांडुरंग उन्फोडे उर्फ बंटी (वय ५३) हा क्रिकेट बॅट हातात घेऊन कार्यालयात घुसला आणि परिसरात वाहने पार्क करायची असतील तर ‘हफ्ता’ द्यावा लागेल, अन्यथा गाड्या उभ्या करू देणार नाही, अशी धमकी दिली.


यावेळी अशोक हांडे यांनी सांगितले की, “आमच्या ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाच्या गाड्या कार्यालयाबाहेर उभ्या होत्या. आरोपी मागील चाळीत राहतो आणि त्या पार्किंगशी त्याचा काहीही संबंध नाही. तरीही तो आमच्या चालकांना वारंवार धमक्या देत होता.”


१ मार्च रोजी तो थेट कार्यालयात घुसला आणि रिसेप्शनिस्ट सुरेश मारुती मंकार यांना शिवीगाळ करत पार्किंगच्या मुद्द्यावरून धमकावू लागला. आवाज ऐकून हांडे बाहेर आले असता आरोपीने त्यांच्या दिशेने धाव घेत क्रिकेट बॅटने त्यांच्यावर हल्ला केला. या झटापटीत आरोपीने अशोक हांडे यांच्या डाव्या कानाजवळ बॅटने मारहाण केली तसेच त्याने त्यांना हातानेही मारहाण केली.


कार्यालयातील कर्मचारी आणि स्थानिकांनी हस्तक्षेप करून आरोपीला बाहेर काढले. मात्र त्यानंतरही तो पुन्हा हांडे यांच्याकडे धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.


पोलिस घटनास्थळी पोहोचले असता आरोपीने पोलिसांनाही शिवीगाळ केल्याचे सूत्रांनी सांगितले. हांडे यांच्या चालकानेही पोलिसांना सांगितले की, सायंकाळी सुमारे ६ वाजता आरोपीने गाडी पार्क करू नका, पैसे द्या, अशी धमकी दिली होती.


या प्रकरणी पोलिसांनी खंडणी मागणे, मारहाण करणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे यांसंबंधी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला २ मार्च रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


महिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले की, “हांडे यांच्या तक्रारीनंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.”



कोण आहेत अशोक हांडे ?


अशोक हांडे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व आहेत. भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी १९८७ मध्ये ‘चौरंग’ संस्थेची स्थापना केली, तर २००५ मध्ये ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमांचे भारतातील अनेक राज्यांसह यूके, अमेरिका, कॅनडा, बेल्जियम आणि संयुक्त अरब अमिरातीमध्येही हजारो प्रयोग झाले आहेत.

Comments
Add Comment

मराठी रंगभूमीवर आता चालणार 'दाभोळकरी पॅटर्न'; 'कॅरी ऑन स्पायगिरी' मधून भरत दाभोळकर यांचा धमाका!

मुंबई: अनेक दशके इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे, 'हिंग्लिश' नाटकांचे प्रणेते आणि

Ranveer Singh : प्रसिद्ध कलाकार होण्यापूर्वी रणवीरसोबत घडला 'हा' घृणास्पद प्रकार

- रणवीरलाही सामोर जावं लागलं 'कास्टिंग काउच'ला मुंबई : बॉलिवूडमध्ये नवख्या कलाकारांना या इंडस्ट्रीत काम

Bigg Boss Marathi 6 : बीग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची तारीख ठरली ?

मुंबई : बीग बॉस मराठी ६ सीजन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सीजनची जोरदार चर्चा रंगली असल्याचे पाहायला

सुरु होणार भक्तीचं महापर्व; संत सखुबाई घेणार जलसमाधी

मुंबई : ‘सन मराठी’वरील ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक अत्यंत भावनिक आणि थरारक भाग पाहायला

Sonalee Kulkarni Manjula song : मंजुळा गाण्यातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी महाराष्ट्राची अप्सरा सज्ज

मुंबई : प्रेक्षकांच्या मनावर अप्सरा म्हणून राज्य करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता हटके आणि नव्या अंदाजात

Cup Bashi Movie : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार सासू-सुनेची 'ही' कमाल जोडी, 'कप बशी' सिनेमाचं पोस्टर रिलीज

सासू आणि सुनेचं नातं म्हटलं की प्रेम, आदर राग तर कधी रुसुवे फुगवे अशा संमिश्र भावना येतात. लवकरच या नात्यातील एक