"मी इराणला परत जाऊ शकत नाही, ... ते मला मारतील..."; बॉलिवूड अभिनेत्रीचा खळबळजनक दावा

इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री एलनाज नौरोजी हिने केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. इराणमधील राजकीय परिस्थितीवर टीका करताना तिने आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर दावा केला आहे.



नेमकं प्रकरण काय?


मूळची इराणी असलेली आणि जॉन अब्राहमसोबत ‘तेहरान’ चित्रपटात दिसलेली अभिनेत्री एलनाज नौरोजी हिने इराणमधील सत्तांतरावर खुलेपणाने मत व्यक्त केले. इराणमध्ये खऱ्या अर्थाने सत्ताबदलाची गरज असल्याचे सांगत सध्याची व्यवस्था “कॅन्सरसारखी” असल्याची तीव्र टीका तिने केली.


दरम्यान, इराणमध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलगा मोज्तबा खामेनी यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड झाल्याच्या चर्चांवरही एलनाजने प्रश्न उपस्थित केले. हा निर्णय जनतेच्या इच्छेनुसार नसल्याचा आरोप तिने केला.



“इराणमध्ये लोकांना नेता निवडण्याचा अधिकार नाही”


एलनाज नौरोजीने म्हटले की, इराणमध्ये गेल्या अनेक दशकांपासून लोकांचा आवाज दाबला जात आहे. “गेल्या ४७ वर्षांपासून इराणमधील नागरिकांना खऱ्या अर्थाने मतदानाचा अधिकार मिळालेला नाही,” असा दावा तिने केला.


तिने २००९ मधील मोठ्या आंदोलनांचा उल्लेख करत सांगितले की, लाखो लोक रस्त्यावर उतरून “आमचं मत कुठे आहे?” अशी घोषणा देत होते. त्या आंदोलनात अनेक लोकांनी आपले प्राणही गमावले, मात्र परिस्थिती बदलली नाही, असेही तिने सांगितले.



“मी इराणला परत गेले तर मला मारतील” :


इराणमध्ये जन्मलेली एलनाज नौरोजी नंतर कुटुंबासह जर्मनीला स्थलांतरित झाली. सुमारे वीस वर्षांची असताना ती भारतात आली आणि चित्रपटसृष्टीत काम करू लागली. एलनाजने सांगितले की, ती गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ इराणला गेलेली नाही आणि सध्याच्या परिस्थितीत तिथे परत जाणे शक्य नाही. “मी इराणला परत जाऊ शकत नाही. जर मी तिथे गेले तर माझ्या जीवाला धोका आहे. ते मला मारून टाकतील,” असा धक्कादायक दावा तिने केला आहे.


तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून इराणमधील राजकीय परिस्थितीवरही पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Comments
Add Comment

धनंजय मानेंवरही धुरंधरची क्रेझ, सोशल मिडियावर घातला धूमाकूळ

बॉलिवूडचा'धुरंधर' २ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील काही सीन सोशल मीडियावर मोठ्या

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा कोकणात अपघात, उंच चढावरून घसरली बाईक

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोममधून घराघरात पोहचलेला लोकप्रिय अभिनेता निखिल बने याचा कोकणात बाईक राईड करताना

Dhurandhar 2 : 'त्या' व्हायरल व्हिडीओवर आदित्य धरचा संताप, नेटकऱ्यांना दिला कारवाईचा इशारा

रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातला आहे. या सिनेमाचे अनेक सिन सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत

Dhurandhar 2 : धुरंधरची रेकॉब्रेक कमाई सुरुच, आठवड्यातच १००० कोटींचा टप्पा पार

मुंबई : रणवीरच्या धुरंधर २ सिनेमानं रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून जगभरात सर्वांना वेड लावलं आहे. आदित्य धर

माधुरी दीक्षितच्या सौंदर्याची सर्वांना भुरळ, 'या' गोष्टींमुळे अजूनही दिसते इतकी सुंदर

मुंबई - बॉलिवूडची धक-धक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित ५८ वर्षांची असूनही माधुरीच्या सौंदर्यांची भुरळ

रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांचा कट उघड, पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई - हिंदी सिनेमा दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथे असलेल्या 'शेट्टी टॉवर' घरावर झालेल्या गोळीबार