Dhurandhar 2 : धुरंधरची रेकॉब्रेक कमाई सुरुच, आठवड्यातच १००० कोटींचा टप्पा पार

मुंबई : रणवीरच्या धुरंधर २ सिनेमानं रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून जगभरात सर्वांना वेड लावलं आहे. आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून हा सिनेमा रिलीज होऊन तब्बल आठ दिवस झाल्यानंतरही धुरंधर २चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. अवघ्या आठवडाभरातच या सिनेमानं १००० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. इतक्या कमी कालावधीत एवढी कमाई करणारा हा बॉलिवूडचा पहिलाच सिनेमा ठरला आहे.


प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी या सिनेमानं भारतात ४७.७ कोटी रुपये कमावले. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार या सिनेमाचं भारतातील एकूण कलेक्शन ६२३.४२ कोटी एवढं झालं असून जगभरात या सिनेमानं १००६.५ कोटी रुपयांची कमाई करत नवा विक्रम रचला आहे.


इतर भाषांमधून किती कमाई केली ?


धुरंधर २ हा सिनेमा १९ मार्च २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित झाला. प्रीमियरच्या दिवशी सिनेमानं ४३ कोटी रुपये कमावले. यानंतर सर्व पाचही भाषांमधून पहिल्या दिवशी १०२.५५ कोटी रुपयांची कमाई या सिनेमानं केली. तर, शनिवारी आणि रविवारी या सिनेमानं ११३ आणि ११४ कोटी रुपयांची कमाई केली.


रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेल्या धुरंधर २ सिनेमात अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी आणि आर माधवन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमानं अवघ्या सात दिवसांत देशभरात ६२३.४२ कोटींची कमाई केली असून यातील सर्वाधिक म्हणजेच ५८६.७२ कोटींची कमाई हिंदी आवृत्तीतून केली आहे . तर २०.५६ कोटी तेलुगुतून ९.०९ कोटी तमिळ तर ६० लाख कन्नड आवृत्तीतून या सिनेमानं कमावले आहेत.


रणवीरच्या धुरंधर २ सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम मोडीत काढला असून आता सर्व बॉलिवूड सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक करत जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० भारतीय सिनेमांच्या यादीत धुरंधर २ सिनेमानं आपलं नाव नोदवलं आहे.

Comments
Add Comment

Lalit Prabhakar-Prajakta Mali: : ललित -प्राजक्ता पुन्हा एकत्र; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर चर्चेत

मुंबई : कधीकाळी छोट्या पडद्यावर आपल्या सहजसुंदर केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकणारी ललित प्रभाकर आणि

Govinda Sunita Divorce : 'हा काय तमाशा चालवलाय?' सुनीताने घटस्फोटाची याचिका मागे घेताच गोविंदाचा मॅनेजर भडकला

मुंबई : बॉलिवूड अभिनेते गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनिता आहुजा यांच्या नात्याबाबत गेल्या काही काळापासून चर्चा

Eijaz Khan on Govinda controversy : गोविंदा-सुनीता वादात एजाज खानची एण्ट्री; म्हणाला, “मुलांना भविष्यात काम मिळणं कठीण होऊ शकतं”

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता अहुजा (Govinda - Sunita Ahuja) यांच्या वैवाहिक नात्यातील मतभेद पुन्हा

Raj Kundra : 'जीव संपवण्याचा विचार'; आर्थर रोड जेल, घटस्फोटाची अफवा अन् शिल्पाच्या एका फोन कॉलचा 'तो' किस्सा; राज कुंद्राचा खुलासा

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) २०२१ मधील पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे

Govinda And Sunita Ahuja : सुनीता आहुजा फॅमिली कोर्टाबाहेर? सुखी संसारात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री

मुंबई : अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून

Zindagi Na Milegi Dobara 2 : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार

मुंबई : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची (पुढील भागाची) वाट