धनंजय मानेंवरही धुरंधरची क्रेझ, सोशल मिडियावर घातला धूमाकूळ

बॉलिवूडचा'धुरंधर' २ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील काही सीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहेत. विशेष म्हणजे या सिनेमातील अभिनेता रणवीर सिंहचा शेवटचा सीन अतिशय भावुक करणारा आहे. सिनेमातील रणवीरचा हा सीन पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.


पण, सोशल मीडिया कंटेंट क्रीएटर सुमित पाटील यानं एक आगळीवेगळी शक्कल लढवत 'धुरंधर'मधील हा सीन आणि मराठी प्रेक्षकांचा जीव की प्राण असलेला 'अशी ही बनवाबनवी' सिनेमातील काही पात्रांसह एक वेगळाच व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून हा व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस
उतरला आहे.


या व्हिडीओत सुमितने 'धुरंधर' सिनेमातील त्या भावुक सीनचा आधार घेतला आहे, जेथे रणवीर सिंग आपल्या मिशननंतर मायदेशी परततो. पण यात त्याने 'अशी ही बनवाबनवी' मधील अशोक सराफ (धनंजय माने), सुधीर जोशी (विश्वासराव) आणि लता थत्ते (मालकीण) यांच्या पात्रांचा वापर केला असून यामध्ये त्यानं अशोक सराफ यांनी साकारलेल्या धनंजय मानेचं पात्र रणवीरच्या जागी दाखवलंय.


AIच्या मदतीने तयार केलेल्या या व्हिडीओमध्ये 'Dhanandhar माने इथेच राहत होते' अशा आशयाचे मजेशीर टेक्स्ट वापरण्यात आले आहे. तसेच घरमालक, जुनी केरसुणी आणि ७० रुपयांच्या हिशोबावरून केलेले भाष्य पाहून आजही प्रेक्षकांना हसू आवरता येत नाहीय.


या रीलवर प्रेक्षकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला असून एका युजरने उपरोधिकपणे म्हटंलयं की, "इस्राइलहून औषधं आणणं आता थोडं कठीण आहे", तर दुसऱ्यानं अशोक मामांचं कौतुक करत "महाराष्ट्रचे अशोक मामा... ऑल टाइम फेव्हरेट" अशी कमेंट केली आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून हसून हसून डोळ्यात पाणी आल्याचं म्हटलं आहे.





मराठी प्रेक्षकांसाठी रणवीरच्या 'धुरंधर'पेक्षा अशोक सराफ यांनी साकारलेला 'धनंजय माने' अर्थात 'धनंधर' नेहमीच वरचढ असेल. हे या व्हिडीओतून सिद्ध झाले आहे. एआयचा वापर करून बनवलेला हा 'कॉमेडी व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Comments
Add Comment

Toxic Movie : रिव्ह्यू देणं पडलं महाग! 'टॉक्सिक'वर नकारात्मक बोलणाऱ्या युट्यूबरची अडचण वाढली; निर्मात्यांच्या एका निर्णयाने सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई :  कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट प्रदर्शित

Amaal Mallik : अमाल मलिकचा चित्रपट संगीताला तात्पुरता विराम; म्हणाला, ‘आता माझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार’

मुंबई : संगीतकार आणि गायक अमाल मलिकने सध्यापुरता चित्रपटांसाठी नवीन संगीत देण्यापासून दूर राहण्याचा निर्णय

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Shweta Tiwari : श्वेता तिवारी प्रकरणात मोठा ट्विस्ट; ट्रोलर मनसेचा सदस्य नसल्याचं उघड

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीने ऑनलाइन महिलांविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या काही सोशल

Kriti Sanon Rakhi Ad : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीचा वाद चिघळला; सोनू निगमच्या नावाने फेक पोस्ट अन् मोठा ट्विस्ट!

मुंबई : कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. GIVAच्या या

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत