मुद्दाम बेस्ट बस भांडुप स्टेशनबाहेरील पादचाऱ्यांवर चढवली, चालक संतोष सावंतवर आरोप करणारे ७०४ पानी आरोपपत्र दाखल

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर आणि लगतच्या बेस्ट बस स्टॉपवर प्रचंड गर्दी जमते, याची बेस्ट बस चालक संतोष रमेश सावंत याला पूर्ण कल्पना होती. हे माहीत असूनही त्याने इलेक्ट्रिक बस वेगाने प्रवाशांच्या अंगावर चढवली, त्यामुळे चौघा जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले, असे भांडुप पोलिसांनी ७०४ पानांच्या आरोपपत्रात नमूद केले आहे.


मुंबईतील भांडुप येथे २९ डिसेंबर २०२५ च्या रात्री ९.३० ते ९.४० दरम्यान भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर आणि लगतच्या बेस्ट बस स्टॉपवर बेस्ट बसचा मोठा अपघात झाला. या प्रकरणात बस चालक असलेल्या ५२ वर्षांच्या संतोष सावंतला पोलिसांनी अटक केली. आता पोलिसांनी चौकशीअंती चालक संतोष सावंतवर मुद्दाम बेस्ट बस भांडुप स्टेशनबाहेरील पादचाऱ्यांवर चढवल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी त्यांचे ७०४ पानांचे आरोपपत्र मुलुंड येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केले आहे. आरोपपत्रात बस चालक संतोष सावंत याने जाणूनबुजून आणि उद्देशपूर्वक बेस्ट इलेक्ट्रिक बसचा हत्यारासारखा वापर करुन पोलिस चौकीच्या मागच्या वळणावरुन वेगाने गाडी दामटवली आणि थांब्यावर वाट पाहणाऱ्या प्रवाशांना धडक दिली असा आरोप आहे.


रात्रीच्या गस्तीवर असलेले तक्रारदार बीट मार्शल सुधीर पाटील यांनी दिलेला आरोपपत्रात नोंदवला आहे. या जबाबानुसार चालकाला धोका असल्याची जाणीव असूनही त्याने जाणूनबुजून आणि बेपर्वाईने प्रवाशांना गाडीने चिरडले. तपास अधिकारी पीएसआय संतोष चाटे यांनी सांगितलं की, संतोष सावंत याला त्याच्या कृत्यामुळे इतरांचा मृत्यू किंवा गंभीर दुखापत होण्याची जाणीव असूनही त्याने गाडी चालवली. धडकेमुळे बस स्टॉपचा खांब वाकला आणि अनेक जण बसखाली अडकले. जखमींना राजावाडी आणि मुलुंड रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तीन महिला आणि एक पुरुष अशा चौघांना मृत घोषित करण्यात आलं.


संतोष सावंत याच्यावर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार बेपर्वाईने वाहन चालवण्यासोबतच गंभीर दुखापत आणि जीवास धोका निर्माण केल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे, रुग्णालयातील नोंदी, फॉरेन्सिक निष्कर्ष, आरटीओ तपासणी अहवाल आणि सायन रुग्णालयात केलेल्या मानसिक आरोग्य मूल्यांकनांवरुन निष्कर्ष काढला आहे. अंतिम मानसिक चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)