Gujrat Viral Video : काळ आला होता पण वेळ...गुजरातच्या वलसाडमधील लिफ्टचा भीषण अपघात; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

वलसाड : गुजरातच्या वलसाड येथील 'सरदार हाईट्स' या गुजरात हाऊसिंग बोर्ड संकुलात आज सकाळी काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना घडली. संकुलातील साबरमती बिल्डिंगमध्ये लिफ्टचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये एक रहिवासी मृत्यूच्या दारातून सुखरूप परतला आहे. या संपूर्ण घटनेचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, ते पाहून पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येत आहे.



नेमकी घटना काय ?




मिळालेल्या माहितीनुसार, साबरमती बिल्डिंगमध्ये राहणारे वत्सलभाई पंचाल हे सकाळी आपल्या कामासाठी लिफ्टने जात होते. ते लिफ्टमध्ये प्रवेश करत असतानाच अचानक लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि लिफ्ट कोसळली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये वत्सलभाई या भीषण अपघाताचा बळी ठरताना स्पष्ट दिसत आहेत. लिफ्ट वेगाने खाली गेल्यामुळे त्यांना गंभीर अंतर्गत जखमा झाल्या आहेत. हा अपघात इतका भीषण होता की वत्सलभाईंचा जीव जाण्याची दाट शक्यता होती. मात्र, 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' या म्हणीप्रमाणे ते या संकटातून चमत्कारिकरीत्या बचावले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.



मेंटेनन्सवर संताप आणि सवाल


या घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गुजरात हाऊसिंग बोर्ड संकुलासारख्या मोठ्या इमारतीत लिफ्टची नियमित देखभाल (Maintenance) का केली जात नव्हती? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. लिफ्टच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कंत्राटदारावर आणि सोसायटीच्या व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्याची मागणी रहिवासी करत आहेत.

Comments
Add Comment

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे

पीएनजी असलेल्या भागात एलपीजी पुरवठा होणार बंद

नवी दिल्ली : देशातील ऊर्जा साखळीत मोठी सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले

आकाशवाणीवरुन २६ मार्चपासून "वंदे मातरम्" राष्ट्रीय गीताची पूर्ण आवृत्तीचे प्रसारण

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी केंद्रांच्या सकाळच्या प्रसारणाची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण 'सिग्नेचर

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

नवी दिल्ली : पोटात संसर्ग झाल्याची तक्रार केल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना मंगळवारी