Thane: अभिनेत्री ज्युनियर कलाकारांना आमिष दाखवून करत होती फसवणूक; सेक्स रॅकेट प्रकरणात अटकेत

ठाणे: ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी २७ वर्षीय एका अभिनेत्रीला अटक करण्यात आली असून, ती हिंदी मालिका आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या ज्युनिअर कलाकारांना पैशांच्या आमिषाने वेश्याव्यवसायात ढकलत होती. रविवारी पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभिनेत्रीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. अभिनेत्रीने एका पीडित तरुणीसाठी बनावट ग्राहकाकडून ३० हजार रुपये स्वीकारले. यातील २० हजार रुपये ती स्वतःकडे ठेवणार होती, तर केवळ १० हजार रुपये पीडित तरुणीला देण्याचे ठरले होते. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी या अभिनेत्रीला रंगेहाथ पकडत अटक केली.



'यूट्यूब' आणि 'मॉडेलिंग'चा आधार


तपासात असे समोर आले आहे की, ही अभिनेत्री स्वतः काही हिंदी मालिकांमध्ये काम करते. तिने यूट्यूब चॅनल आणि मॉडेलिंग क्षेत्रात ओळख असलेल्या अनेक गरजू तरुणींची या व्यवसायासाठी निवड केली होती. गेल्या वर्षभरापासून ती हे रॅकेट चालवत असल्याची कबुली तिने पोलिसांना दिली आहे.


या कारवाई दरम्यान पोलिसांनी दोन पीडित तरुणींची सुटका केली आहे. या तरुणींना पुढील पुनर्वसनासाठी सरकारी महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मगरपट्ट्याच्या मागील बाजूस कॅनल फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी

पुणे : मगरपट्टा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असून

पुणे - मुंढव्यातील पासपोर्ट कार्यालय पाषाणला स्थलांतरित होणार

पुणे : परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) आता कायमस्वरूपी

सोलापूर महापालिका व जिल्हा परिषदेवर भाजपचा दबदबा - विरोधी पक्षनेत्याशिवायच कारभार सुरू

सोलापूर : सोलापूर महापालिकेत १०२ पैकी ८७ जागा भाजपने जिंकल्या असून, आठ जागा मिळविलेला एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर

Ashok Kharat Case: दोन महिने आधी प्रकरण बाहेर, मात्र खरातला वाचण्यासाठी कुणी ताकद लावली?

नाशिक: लैंगिक शोषण प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर आता खरातचे विकृत कारनामे समोर येऊ लागले आहेत. अशोक

Weather Update: महाराष्ट्रात २४ तासात हवानमान बदलणार, पश्चिम महाराष्ट्रात गारपीट तर ५ जिल्ह्यांत हिटवेवटचा इशारा

मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीला उकाडा प्रचंड वाढला होता. मात्र त्यानंतर तुफान गारपीट झाली. हीच गारपीट आता

मराठमोळा शिव ठाकरे ठरला 'द ५० इंडिया' शोचा विजेता

मुंबई: मराठी अभिनेता शिव ठाकरे याने 'द ५० इंडिया' शोच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे. त्याने 'द ५० इंडिया' ट्रॉफी आणि