Ashok Kharat Case: दोन महिने आधी प्रकरण बाहेर, मात्र खरातला वाचण्यासाठी कुणी ताकद लावली?

नाशिक: लैंगिक शोषण प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर आता खरातचे विकृत कारनामे समोर येऊ लागले आहेत. अशोक खरातच्या जवळ १०० व्हिडीओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. आता आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. अशोक खरातला पोलिसांकडून काही महिने आधीच अटक झाली असती. मात्र, एका पॉवरफुल व्यक्तीनं त्याच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर ठेवल्यानं अटक टळली असल्याची माहिती समोर आली आहे.


संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या खरात प्रकरणाचा भांडाफोड काही महिने आधीच झाला असता, मात्र एका बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या 'आंधळ्या भक्ती'मुळे खरातला मोकळे रान मिळाल्याची खळबळजनक चर्चा आता रंगू लागली आहे. गुन्हेगाराला बेड्या ठोकण्याऐवजी त्याला वाचवण्याचा आणि उलट तक्रारदारांनाच धडा शिकवण्याचा सल्ला या अधिकाऱ्याने दिल्यामुळे हे प्रकरण दडपले गेल्याचे समोर येत आहे.



पोलीस अधिकारी की खरातचा सेवक?



या संपूर्ण प्रकरणात नाशिकमधील एका अतिउच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. हा अधिकारी खरातचा इतका मोठा भक्त होता की, खरातच्या मुलीच्या साखरपुड्यात त्याने कौतुकास्पद भाषण केले होते. आपल्या घरचं कार्य असल्यासारखी धडपड, पळापळ या अधिकाऱ्याने केली असल्याचे दिसून आले. ही बाब अनेकांच्या लक्षात आली होती.


जेव्हा खरातने या क्लिप्स या अधिकाऱ्याला दाखवल्या, तेव्हा एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याने तत्काळ कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, खरातच्या प्रेमापोटी या अधिकाऱ्याने क्लिप्स पाठवणाऱ्यांविरुद्धच खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. याच सल्ल्याने खरातचा घात झाला आणि प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.


खरातला आलेल्या त्या क्लिप्स केवळ एकदाच पाहता येणार होत्या. पुन्हा पाहण्यासाठी सॉफ्टवेअरची गरज होती. खरातने आपला मोबाईल या 'भक्त' अधिकाऱ्याच्या विश्वासातील पोलिसांकडे सोपवला. पोलिसांनी आपले तांत्रिक कसब पणाला लावून जेव्हा त्या क्लिप्स उघडल्या, तेव्हा त्यातील दृश्ये पाहून स्वतः पोलीसही हादरले. आपल्या साहेबांच्या लाडक्या खरातचे हे रूप पाहून सत्य सांगायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला होता. अखेर एकाने हिंमत करून सर्व क्लिप्स अधिकाऱ्याला दाखवल्या.


क्लिप्समधील भयानक वास्तव समोर आल्यानंतरही या अधिकाऱ्यातील 'पोलीस' जागा झाला नाही. उलट, "हे बाहेर आले तर तुमची मोठी बदनामी होईल," असा समजुतीचा सूर काढत त्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. जर त्याच वेळी या अधिकाऱ्याने कायद्याचा धाक दाखवून खरातवर कारवाई केली असती, तर दोन-चार महिने आधीच या पापाचा घडा फुटला असता.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून