बुमराहसमोर वेस्ट इंडिजचा हेटमायर हतबल

कोलकाता : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा निर्णायक सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने २० षटकांत ४ बाद १९५ धावा केल्या.


जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडिजच्या चार पैकी दोन फलंदाजांना बाद केले. विशेष म्हणजे बुमराहने शिमरॉन हेटमायरला बाद केले. आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बुमराहने हेटमायरला आतापर्यंत सहा वेळा बाद केले आहे. बुमराहने हेटमायरला आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत २३ चेंडू टाकून ६ वेळा बाद केले आहे. आजच्या सामन्यात शिमरॉन हेटमायरने १२ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार मारत २७ धावा केल्या, त्याला जसप्रीत बुमराहने संजू सॅमसनकरवी झेलबाद केले.


शाई होपने ३३ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकार मारत ३२ धावा केल्या, त्याला वरुण चक्रवर्तीने त्रिफळाचीत केले. रोस्टन चेसने २५ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकार मारत ४० धावा केल्या, त्याला जसप्रीत बुमराहने सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. शिमरॉन हेटमायरने १२ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार मारत २७ धावा केल्या, त्याला जसप्रीत बुमराहने संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. शेरफेन रदरफोर्डने ९ चेंडूत १ षटकार मारत १४ धावा केल्या, त्याला हार्दिक पांड्याने संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. रोवमन पॉवेलने १९ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकार मारत नाबाद ३४ धावा केल्या. जेसन होल्डरने २२ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकार मारत नाबाद ३७ धावा केल्या.

Comments
Add Comment

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी; मुख्यमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'

अटीतटीच्या लढतीत सोलापूरच्या 'बाहुबली'चा ४-३ ने पराभव पुणे : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने आपल्या अनुभवाच्या

Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरी विजेता होणार मालामाल; फॉर्च्युनर कारसह मिळणार लाखोंची बक्षिसे

कुस्तीप्रेमींच्या उत्सुकतेचा कळस गाठलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना आज म्हणजेच

IPL 2026 : हर्षितनंतर आकाश दीपदेखील संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर

आयपीएल २०२६ च्या आधी कोलकाता नाईट रायडर्सच्या अडचणी कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. हर्षित राणानंतर,

IPL 2026 : आयपीएल २०२६ ला दुखापतींचं ग्रहण; अनेक क्रिकेटपटूंच्या दुखापतींमुळे फ्रँचायझींच्या चिंतेत वाढ

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्यास केवळ एक आठवडा शिल्लक असतानाच, अनेक संघ दुखापतींशी झुंजत आहेत. १० पैकी आठ

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि