संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला. या सामन्यात भारताचा सलामीवीर संजू सॅमसनची बॅट तळपली. संजूने ५० चेंडूत ४ षटकार आणि १२ चौकार मारत नाबाद ९७ धावा केल्या. तोच आजच्या सामन्याचा सामनावीर झाला. वेस्ट इंडिजने दिलेले २० षटकांत १९६ धावा करण्याचे आव्हान भारताने १९.२ षटकांत ५ विकेट गमावून पूर्ण केले. या विजयासह भारत दिमाखात उपांत्य फेरीत (सेमी फायनल) पोहोचला. आता गुरुवार पाच मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध भारत हा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामना सुरू होणार आहे.


भारताची फलंदाजी


वेस्ट इंडिजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून अभिषेक शर्माने १०, संजू सॅमसनने नाबाद ९७, ईशान किशनने १०, सूर्यकुमार यादवने १८, तिलक वर्माने २७, हार्दिक पांड्याने १७, शिवम दुबेने नाबाद ८ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर आणि शमर जोसेफने प्रत्येकी २ तर अकील होसेनने १ विकेट घेतली.


वेस्ट इंडिजची फलंदाजी


शाई होपने ३३ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकार मारत ३२ धावा केल्या, त्याला वरुण चक्रवर्तीने त्रिफळाचीत केले. रोस्टन चेसने २५ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकार मारत ४० धावा केल्या, त्याला जसप्रीत बुमराहने सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. शिमरॉन हेटमायरने १२ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार मारत २७ धावा केल्या, त्याला जसप्रीत बुमराहने संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. शेरफेन रदरफोर्डने ९ चेंडूत १ षटकार मारत १४ धावा केल्या, त्याला हार्दिक पांड्याने संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. रोवमन पॉवेलने १९ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकार मारत नाबाद ३४ धावा केल्या. जेसन होल्डरने २२ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकार मारत नाबाद ३७ धावा केल्या.



बुमराहसमोर हेटमायर हतबल


जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडिजच्या चार पैकी दोन फलंदाजांना बाद केले. विशेष म्हणजे बुमराहने शिमरॉन हेटमायरला बाद केले. आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बुमराहने हेटमायरला आतापर्यंत सहा वेळा बाद केले आहे. बुमराहने हेटमायरला आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत २३ चेंडू टाकून ६ वेळा बाद केले आहे. आजच्या सामन्यात शिमरॉन हेटमायरने १२ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार मारत २७ धावा केल्या, त्याला जसप्रीत बुमराहने संजू सॅमसनकरवी झेलबाद केले.

Comments
Add Comment

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी; मुख्यमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'

अटीतटीच्या लढतीत सोलापूरच्या 'बाहुबली'चा ४-३ ने पराभव पुणे : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने आपल्या अनुभवाच्या

Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरी विजेता होणार मालामाल; फॉर्च्युनर कारसह मिळणार लाखोंची बक्षिसे

कुस्तीप्रेमींच्या उत्सुकतेचा कळस गाठलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना आज म्हणजेच

IPL 2026 : हर्षितनंतर आकाश दीपदेखील संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर

आयपीएल २०२६ च्या आधी कोलकाता नाईट रायडर्सच्या अडचणी कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. हर्षित राणानंतर,

IPL 2026 : आयपीएल २०२६ ला दुखापतींचं ग्रहण; अनेक क्रिकेटपटूंच्या दुखापतींमुळे फ्रँचायझींच्या चिंतेत वाढ

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्यास केवळ एक आठवडा शिल्लक असतानाच, अनेक संघ दुखापतींशी झुंजत आहेत. १० पैकी आठ

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि