खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी अयातुल्ला अराफी!

तेहरान : अमेरिकेच्या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर काही तासांतच, अनुभवी धर्मगुरू आणि खामेनी यांचे जवळचे सहकारी अयातुल्ला अलीरेजा अराफी यांना तात्पुरते इराणचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे.


कोण आहेत अयातुल्ला अराफी?


अराफी यांना नेतृत्व परिषदेचे कायदेतज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि त्यांना तात्पुरते सर्वोच्च नेत्याची भूमिका पार पाडण्याचे” काम देण्यात आले आहे, असे वृत्तसंस्था इराणी स्टुडंट्स न्यूज एजन्सीने दिले आहे. अयातुल्ला अली खामेनी यांच्या उत्तराधिकारी होण्याच्या शर्यतीत अराफी हे प्रमुख आघाडीवर होते. ६७ वर्षीय हे एक अनुभवी धर्मगुरू आणि खामेनी यांचे जवळचे सहकारी आहेत. अराफी सध्या सर्वोच्च नेत्याची नियुक्ती करणाऱ्या तज्ञांच्या सभेचे उपाध्यक्ष म्हणून काम करतात. ते इराणच्या मदरसा प्रणालीचेही प्रमुख आहे.


शनिवारी झालेल्या अमेरिका-इस्रायल लष्करी हल्ल्यात १९८९ पासून इराणचे नेतृत्व करणारे ८६ वर्षीय खामेनी ठार झाले. या कारवाईत लष्करी तळ, सरकारी सुविधा आणि वरिष्ठ कमांड साइट्सना लक्ष्य करण्यात आले, ज्यात संरक्षण मंत्री अमीर नासरजादेह आणि कमांडर-इन-चीफ मोहम्मद पाकपूर यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता. अंतरिम परिषदेत आता अध्यक्ष मसूद पेझेश्कियान, मुख्य न्यायाधीश गुलाम-होसेन मोहसेनी-एजेई आणि पालक परिषदेतील धर्मगुरू यांचा समावेश आहे. खामेनी यांच्या निधनानंतर हे तिघेही एकत्रितपणे राज्य कारभाराचे मार्गदर्शन करतील.


खामेनी यांच्या मृत्यूचे पाकिस्तानात पडसाद; अमेरिकन दूतावासावर हल्ला, ८ जणांचा मृत्यू


अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराण आणखी आक्रमक प्रतिहल्ले करत आहे. त्यामुळे आता अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. असं असताना आता अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचे पडसाद थेट पाकिस्तानात उमटले आहेत. पाकिस्तानच्या कराचीमधील अमेरिकन दूतावासावर जमावाने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. खामेनी यांच्या मृत्यूमुळे शिया समुदाय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने कराची येथील अमेरिकन दूतावासावर काही जमावाने संतप्त होत सुरक्षा व्यवस्था भेदून आतमध्ये प्रवेश करत दगड आणि काठ्यांनी तोडफोड केली आहे. तसेच अमेरिकन दूतावासाच्या कार्यालयाच्या काचा फोडत इमारतीला आग लावण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेत ८ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


…तर अतिशय शक्तिशाली हल्ला करू”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा मोठा इशारा


अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यामुळे इराण हादरलं आहे. इराणची राजधानी तेहरानवर अनेक भीषण हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणनेही प्रतिहल्ले केले असून युद्धाचा भडका उडाला आहे. तर अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराणने संतप्त होत अमेरिका आणि इस्त्रायलवर खूप मोठा हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, इराणच्या या इशाऱ्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत पुन्हा अतिशय शक्तिशाली हल्ला करण्याची धमकी इराणला दिली आहे. त्यामुळे आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच ट्रुथ सोशलवर एक पोस्ट केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, “इराणने नुकतंच म्हटलं की ते आज खूप मोठा हल्ला करणार आहेत. जो त्यांनी (इस्रायल-अमेरिकेने) यापूर्वी कधीही पाहिला नसेल. मात्र, त्यांनी (इराणने) असं करून नये. कारण जर इराणने असं केलं तर आपण त्यांच्यावर अतिशय शक्तिशाली हल्ला करू, ज्याची पूर्वी इराणने कधीही कल्पना केली नसेल”, असा मोठा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.


भारतीय कर्मचारी असलेल्या तेल टँकरवर इराणचा भीषण हल्ला; होर्मुझच्या समुद्रात नेमकं काय घडलं?


अमेरिका आणि इस्रायलने सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळील होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका तेल टँकरवर इराणने हल्ला केला आहे. यात १५ भारतीय क्रू होते असंही समोर आलं आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.


ओमानच्या दुक्म बंदरावर ड्रोन हल्ल्यानंतर झालेल्या हल्ल्यात पलाऊ ध्वज असलेल्या तेल टँकरवर ओमानच्या मुसंदम द्वीपकल्पात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात किमान चार जण जखमी झाले आहेत, असे ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने सांगितले. होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक तेल वाहतुकीसाठी एक धोरणात्मक मार्ग आहे, ज्याला जगातील सर्वात संवेदनशील सागरी अडथळा म्हणून वर्णन केले जाते. काल इराणच्या नौदलाने दिलेल्या रेडिओ इशाऱ्यात असा दावा करण्यात आला होता की कोणत्याही जहाजाला अरुंद कॉरिडॉरमधून जाण्याची परवानगी नाही, त्यामुळे हा मार्ग धोक्यात आला.


तेल टँकरमधील कर्मचाऱ्यांना काढले बाहेर


ओमान एमएससीच्या म्हणण्यानुसार, स्कायलाईट नावाच्या या तेल टँकरमध्ये २० जणांचा क्रू होता, ज्यामध्ये १५ भारतीय आणि पाच इराणी नागरिक होते. मुसंदममधील खासाब बंदरापासून साडेनऊन किलोमीटर अंतरावर झालेल्या हल्ल्यानंतर क्रूला बाहेर काढण्यात आले.


इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; देशभर सायरन, लाखो नागरिक आश्रयस्थानांकडे धावले


इराणने क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर इस्रायल हाय अलर्टवर आहे. तेल अवीव आणि देशातील इतर भागांत सायरन वाजत आहेत. टीपीएसच्या वृत्तानुसार, रविवारी इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन सुरू होण्याच्या काही काळापूर्वीच नागरिकांच्या मोबाईल फोनवर क्षेपणास्त्र, रॉकेट किंवा ड्रोन हल्ल्याची आगाऊ सूचना पाठवण्यात आली होती.


इस्रायली संरक्षण दलांनी (आयडीएफ) पुष्टी केली आहे की इराणकडून क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत, ज्यामुळे देशभरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. रहिवाशांना आश्रयस्थानांच्या जवळ राहण्याचा आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अलर्ट सिस्टमने नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी जाण्याचे आणि परिसरात सायरन वाजल्यास सतर्क राहण्याचे निर्देश दिले. त्यानंतर काही वेळातच इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन ऐकू आले.


“चिरडून प्रत्युत्तर” देण्याची शपथ


तेहरानवर अमेरिका-इस्रायलने संयुक्त हल्ला केल्यानंतर हा प्रतिहल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात लष्करी ठिकाणे आणि क्षेपणास्त्र उत्पादन केंद्रांना लक्ष्य करण्यात आले होते. इराणने या कारवाईला “चिरडून प्रत्युत्तर” देण्याची शपथ घेतली असून त्यामुळे प्रदेशातील तणाव अधिक वाढला आहे. दरम्यान, टीपीएसच्या माहितीनुसार, इस्रायलच्या हवाई दलाने गेल्या २४ तासांत इराणमधील लक्ष्यांवर १,२०० हून अधिक युद्धसामग्री टाकल्याचा दावा केला आहे.

Comments
Add Comment

Iran-US Peace Treaty : शांतता चर्चेच्या अपयशासाठी इराणने अमेरिकेला धरले जबाबदार

पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील निष्फळ झालेल्या चर्चेनंतर, इराणने म्हटले आहे की, वाटाघाटी अजून संपलेल्या नाहीत.

Iran-US Peace Treaty : ४० दिवसांच्या संघर्षाची २१ तास चाललेली चर्चा निष्फळ; जे.डी. व्हान्स पाकिस्तानमधून तातडीने निघाले, नेमकं काय घडलं?

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद (Islamabad) येथे अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली बहुचर्चित शांती चर्चा अखेर

Iran-US Peace Treaty : अमेरिका-इराणचे शिष्टमंडळ दाखल, इराणच्या चार प्रमुख मागण्या

शस्त्रसंधी चर्चेसाठी अमेरिका आणि इराणची शिष्टमंडळे पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये दाखल झाली आहेत. अमेरिकन

Chimpanzees Civil War : सातासमुद्रापार सेंट्रल, वेस्टर्नचा संघर्ष पेटला, एकेकाळी मित्र असलेले घेतायत एकमेकांचा जीव

कंपाला : एकेकाळी एकमेकांसोबत गुण्यागोविंदानं राहणारे चिम्पांजी एकेमकांच्या जीवावर उठल्याचा प्रकार घडला आहे.

Melania Trump On Epstein Files : एकीकडे युद्ध सुरु असताना अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने सोडले 'एपस्टईन फाइल्स' विषयी मौन; म्हणाल्या...

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या एपस्टईन फाइल्सविषयी (Epstein Files) अखेर अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने मौन सोडलं

Iran-US Peace Treaty : शांतता चर्चेपूर्वी तणाव शिगेला! अमेरिकेच्या 'त्या' कृतीची आठवण करून देत इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल

अमेरिकेसोबत होणाऱ्या महत्त्वाच्या शांतता चर्चेसाठी इराणचे ७१ सदस्यीय शिष्टमंडळ शुक्रवारी (१० एप्रिल) उशिरा