Mumbai Traffic AI Management System : आता मुंबईच्या ट्राफ‍िक मॅनेजमेंटसाठी होणार AI ची मदत

- मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांची माहिती


मुंबई : एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईच्या ट्राफ‍िक मॅनेजमेंटचा प्लॅन तयार करण्यात येत आहे. तसेच याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली.


विधानसभेत आज (२८ फेब्रुवारी) आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरी येथे होणाऱ्या वाहतुक कोंडीकडे सरकारचे लक्ष वेधले. तर दुसरीकडे आमदार अस्लम शेख यांनी मुंबईतील अनेक रस्त्यांवर प्रवेश नसलेल्या मार्गावर उलट दिशेने गाड्या चालवल्या जात असल्यामुळे होणारे अपघात आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याबद्दल तक्रार केली. तसेच आमदार वरुण सरदेसाई यांनी वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रातील बिकेसी, कला नगर, कुर्ला ते सांताक्रुझ जोड मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग या परिसरात होत असलेल्या वाहतुक कोंडीकडे सभागृहाचे लक्ष वेधले तर आमदार दिलीप लांडे यांनी चांदिवली परिसरातील वाहतुक कोंडीचा मुद्दा मांडला.


यावर उत्तर देताना मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगीतले की, याबाबत नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून, वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्तांना याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईचा वाहतूक नियोजन आराखडा मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तयार करण्यात येत असल्याचे सांगितले.


तसेच मुंबईतील रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या भंगार गाडयांचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार असून मुंबई महापालिका याबाबत कार्यवाही करीत आहे, तसेच मुंबईतील आमदारांनी ज्या सूचना केल्या आहेत त्याचा विचार करुन याबबात लवकरच बैठकही घेण्यात येईल, असे मंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.

Comments
Add Comment

सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली उघड; कर्मचारीच....

मुंबई : प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात चोरीची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

राज्यातील हॉटेल, ढाबे,उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी महत्वाची अपडेट

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पातील

अचानक मोबाईलचं नेटवर्क गायब झाल्यास 'या' गोष्टी करा

सध्याच्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आजच्या काळात एकमेकांशी संपर्क

MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?

मुंबई: मुंबई-ठाणे या शहरात हक्काचे घर घेणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे मात्र याच शहरात तुमचं घर होणारं.

Mumbai Metro: मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आता मेट्रोमध्ये मोबाईल पूर्णपणे बंद राहणार

मुंबई : मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी एक आश्चर्यजणक बातमी समोर आलेली आहे. आता मेट्रोतून प्रवास करताना