1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने रेल्वे आरक्षण, बँक ठेवी आणि UPI व्यवहारांशी संबंधित नियमांचा समावेश आहे. हे बदल केवळ प्रशासकीय नसून, त्यांचा थेट परिणाम तुमच्या महिन्याच्या बजेटवर आणि दैनंदिन आर्थिक नियोजनावर पडणार आहे. १ मार्चपासून होणाऱ्या बदलांचा प्रभाव तुमच्या स्वयंपाकघरापासून ते थेट हातातल्या मोबाईल फोनपर्यंत दिसून येईल. यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे LPG गॅस सिलेंडरच्या दरातील संभाव्य सुधारणा. दर महिन्याच्या सुरुवातीला गॅस कंपन्या किमतींचा आढावा घेतात, त्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमती बदलू शकतात. प्रवाशांसाठी रेल्वे तिकीट बुकिंगच्या प्रक्रियेत किंवा सॉफ्टवेअरमध्ये काही महत्त्वाचे बदल दिसू शकतात. कोणते कोणते बदल होणार आहेत जाणून घ्या.



१. रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी


रेल्वे प्रवासाच्या तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये १ मार्चपासून आमूलाग्र बदल होत आहे. आतापर्यंत लाखो प्रवासी जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी वापरत असलेले जुने UTS App पूर्णपणे बंद होणार आहे. त्याऐवजी, रेल्वे आता 'Rail One App' हे नवीन आणि अद्ययावत ॲप्लिकेशन लाँच करत आहे. या एकाच ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना केवळ जनरल किंवा प्लॅटफॉर्म तिकीटच नाही, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण (Reservation) देखील करता येणार आहे. जुन्या ॲपमधील तांत्रिक सुविधा १ मार्चपासून बंद होत असल्याने प्रवाशांनी नवीन ॲप डाऊनलोड करणे अनिवार्य ठरेल.



२. बँकिंग आणि UPI व्यवहारांत सुरक्षेचा 'डबल डोस'


डिजिटल व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी १ मार्चपासून UPI च्या नियमात मोठी सुधारणा केली जात आहे. आता मोठी रक्कम ट्रान्सफर करताना केवळ पिन (PIN) टाकून चालणार नाही, तर सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर म्हणून बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन (ठसा किंवा फेस आयडी) आणि एक्स्ट्रा ऑथेंटिकेशन पूर्ण करावे लागेल. यामुळे सायबर फसवणुकीला लगाम बसेल. बँकिंग क्षेत्रातील दुसरा मोठा बदल म्हणजे सरासरी मासिक शिल्लक (Average Monthly Balance) मोजण्याची पद्धत. आता ही शिल्लक महिन्याच्या एकूण सरासरीवर गृहीत धरली जाणार असल्याने, ग्राहकांना दंडाचा फटका बसण्याची शक्यता कमी होईल आणि मोठा आर्थिक फायदा मिळेल.



३. व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसाठी 'सिम बाइंडिंग' अनिवार्य


सोशल मीडिया ॲप्सचा गैरवापर रोखण्यासाठी १ मार्चपासून व्हॉट्सॲप (WhatsApp) आणि टेलिग्राम (Telegram) साठी 'सिम बाइंडिंग' (SIM Binding) हा कडक नियम लागू होत आहे. या नियमानुसार, तुमचे मेसेजिंग ॲप्स तुमच्या फोनमधील सक्रिय सिम कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे. जर तुमच्या फोनमध्ये प्रत्यक्ष सिम कार्ड नसेल किंवा ते बंद असेल, तर तुम्ही त्या फोनवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम वापरू शकणार नाही. बनावट अकाऊंट्स आणि ओटीपी घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.



४. स्वयंपाकघराचे बजेट बदलणार?


दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे १ मार्च रोजी देखील इंधन कंपन्या गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर करतील. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होत असताना, सर्वसामान्यांचे लक्ष घरगुती गॅस सिलेंडरच्या (LPG) किमतींकडे लागले आहे. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅसचे दर स्थिर असले तरी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे १ मार्चला यामध्ये किमती वाढणार की घटणार, हे स्पष्ट होईल. यामुळे गृहिणींच्या बजेटवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Niranjan Davkhare : मुंबई-ठाणेकरांचा मेट्रो प्रवास लवकरच सुसाट! 'मेट्रो-४' प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने उद्घाटनाचे सरकारचे नियोजन

मुंबई : मुंबई आणि ठाणे या जोडशहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणाऱ्या 'मेट्रो-४' (ग्रीन लाईन) प्रकल्पाचे काम

Mumbai Traffic AI Management System : आता मुंबईच्या ट्राफ‍िक मॅनेजमेंटसाठी होणार AI ची मदत

- मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांची माहिती मुंबई : एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईच्या ट्राफ‍िक

Chembur Accident : चेंबूरमध्ये भीषण अपघात; बांधकामाच्या ८व्या मजल्यावरून ६ कामगार खाली पडले

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष नगर भागात सुरू असलेल्या एका निर्माणाधीन

Vijay Rashmika : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रश्मिका-विजयने दिली 'गुड न्यूज'; चाहत्यांना सुखद धक्का!

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकले

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन