शरद पवारांसाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाचा नकार

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. "राज्यसभेच्या जागेसाठी कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा दावा सोडणार नाही, आमच्या पक्षातील आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर आपले मत मांडले आहे. २०२० मध्ये आम्ही फौजिया खान यांच्या उमेदवारीवेळी मदत केली होती. मात्र, आमचे उमेदवार संजय पवार हे संख्याबळ असताना सुद्धा पराभूत झाले. आता आमचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे जर आमचा खासदार कार्यकाळ पूर्ण करत असेल, तर आमच्याच पक्षाचा उमेदवार राज्यसभेसाठी जाईल", असे ते म्हणाले.


राज्यातील राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्चला निवडणूक होत आहे. विद्यमान संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एक जागा येईल. या जागेवर शरद पवार यांनी पुन्हा जावे, अशी इच्छा राष्ट्रवादीकडून (शरदचंद्र पवार गट) व्यक्त केली जात असतानाच ठाकरे गटाने त्यास नकार दिला आहे. वरुण सरदेसाई यांनी यावेळी २०२० मधील निवडणुकीचा संदर्भ देत राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. "२०२० मध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावली होती. मात्र, त्यानंतर आमच्याकडे संख्याबळ असतानाही संजय पवार यांचा पराभव झाला. त्या अनुभवातून आम्ही शिकलो आहोत. आता संख्याबळानुसार आमचाच दावा मोठा आहे," असे सरदेसाई म्हणाले.



आदित्य ठाकरेंची बैठकीला 'दांडी'


राज्यसभेच्या जागेवर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीने बोलावलेल्या दोन बैठकांना आमदार आदित्य ठाकरे यांनी दांडी मारली आहे. जागेच्या मुद्द्यावर तडजोड करण्यास उबाठा गटाचा विरोध असल्याचे समजते. विशेष म्हणजे विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागेवरही सरदेसाई यांनी हक्क सांगितला आहे. "उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने रिक्त होणारी विधान परिषदेची जागा आमचीच असेल. राज्यसभा आणि विधान परिषद हे दोन्ही स्वतंत्र विषय असून दोन्ही जागांवर आमचाच उमेदवार असेल," असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

Congress: काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर

मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर राजकीय

Uttar Pradesh Accident: बोलेरोने मागून उभ्या असलेल्या टँकरला दिली धडक; अपघातात ५ जण ठार, अनेक जण जखमी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

Baramati Assembly by-election : बारामती पोटनिवडणुकीत महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी

- निवडणूक बिनविरोध करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे इतर सर्व पक्षांना आवाहन ठाणे : बारामती विधानसभा

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या