मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पुण्यातील पासपोर्ट कार्यालय आणि मुंबईतील दहिसर परिसरातील एका नामांकित शाळेला लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.



पुण्यात पासपोर्ट कार्यालयाला धमकी


रिजनल पासपोर्ट ऑफिस पुणे येथील अधिकृत ई-मेल आयडीवर गुरुवारी सकाळी स्फोटकांच्या वापराचा उल्लेख असलेला संदेश प्राप्त झाला. बाणेर–पाषाण लिंक रोड परिसरातील या कार्यालयात RSX स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आल्याचे समजते.


माहिती मिळताच पुणे पोलिसांनी यांनी तातडीने बॉम्बशोधक व नाशक पथकाला घटनास्थळी पाठवले. कार्यालय, पार्किंग तसेच आसपासच्या परिसराची सखोल तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान कोणतीही स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू आढळली नसल्याने प्रशासनाने दिलासा व्यक्त केला. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे.



दहिसरमधील शाळेला ई-मेल


दरम्यान, मुंबईतील JBNC इंटरनॅशनल शाळेलाही अशाच प्रकारचा धमकीचा संदेश प्राप्त झाला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शाळा प्रशासनाने तात्काळ सुट्टी जाहीर केली आणि संपूर्ण परिसर सील करण्यात आला. दरम्यान मुंबई उपनगरातील सुमारे २२ ते २५ शाळांना अशाच प्रकारचे धमकीचे ई मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई उपनगरातील सुमारे २२ ते २५ शाळांना अशाच प्रकारचे धमकीचे ई मेल पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे या सर्व ई- मेलचा एकमेकांशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.



तपास यंत्रणा अलर्टवर


गेल्या काही महिन्यांत महत्त्वाच्या सरकारी आणि शैक्षणिक संस्थांना अशा प्रकारचे ई-मेल येण्याच्या घटना वाढल्या आहेत. बहुतांश प्रकरणे अफवा ठरली असली तरी प्रत्येक घटनेकडे गंभीरतेने पाहिले जात आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि संशयास्पद बाब त्वरित कळवण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Megablock : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेने मुंबई विभागातील तिन्ही उपनगरीय मार्गांवर रविवारी १२ एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल

Maharashtra : अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : अवजड मोटार वाहन (एचएमव्ही) चालकांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने क्लिनर ठेवण्याची अट रद्द केली आहे.

RTE साठी महाराष्ट्रातील १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया

परिणामकारक महसूल सेवेसाठी राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर बंधने

मुंबई : महसूल विभागातील राजपत्रित अधिकारी वारंवार आणि दीर्घकाळ इतर विभाग किंवा महामंडळांमध्ये प्रतिनियुक्तीवर

BMC : स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांनी स्वयंशिस्त मोडमध्ये यावे!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नागरी स्वच्छता ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे नमुद केले. स्वच्छतेकडे एखाद्या

BMC : 'मुंबईत एकही गटाराचे झाकण उघडे राहता कामा नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कोणत्याही परिस्थितीत एकही मनुष्य प्रवेशिका अर्थात गटाराची झाकणे उघडी राहणार नाही, याची