पिंट्या’ फेम रोहन गुजर होणार बाबा; आठ वर्षांनंतर आयुष्यातआला आनंद

मुंबई : 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पिंट्या म्हणजेच अभिनेता रोहन गुजर लवकरच बाबा होण्याचा आनंद अनुभवणार आहे. लग्नानंतर तब्बल आठ वर्षांनी त्याच्या कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची गोड बातमी त्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या खास क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.



डोहाळे जेवणाचा सोहळा


रोहनची पत्नी स्नेहल हिच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. स्नेहलने पारंपरिक साडी आणि फुलांचे दागिने परिधान केले होते, तर रोहनने देखील समारंभाला साजेसा पोशाख केला होता. कुटुंबीय आणि जिवलग मित्रांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला.



सोशल मीडियावरून दिली खुशखबर


अभिनेत्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर व्हिडिओ शेअर करत या विशेष क्षणाबद्दल भावना व्यक्त केल्या. “हा दिवस आणखी खास बनवणाऱ्या सगळ्यांचे आभार,” असे कॅप्शन देत त्याने चाहत्यांचे प्रेम स्वीकारले. पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


रोहन आणि स्नेहल यांनी २०१७ मध्ये विवाह केला होता. कोरोनाकाळात स्नेहलने आरोग्याशी संबंधित गंभीर लढा दिला होता. त्या कठीण काळात रोहन तिच्यासोबत ठामपणे उभा राहिला. आता या नव्या टप्प्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट उगवली आहे.



कारकिर्दीचा प्रवास


रोहनने 'होणार सून मी या घरची' या मालिकेत साकारलेल्या पिंट्याच्या भूमिकेमुळे लोकप्रियता मिळवली. नंतर लव्ह लग्न लोचा, सांग तू आहेस ना, नवी जन्मेन मी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं . एकांकिकेपासून मालिका, चित्रपट असा प्रवास करणारा अभिनेता रोहन गुजर 'आमने सामने' नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.


Comments
Add Comment

Rashmika-Vijay Reception : कुर्गमध्ये पार पडला रश्मिका-विजयचा दुसरा ग्रँड रिसेप्शन सोहळा, रश्मिकाला मिळालं 'हे' कोट्यवधींच सरप्राइज

साऊथबरोबरच संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजेच अभिनेता विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना

Lata Deenanath Mangeshkar Award : यंदा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'ने कैलाश सत्यार्थी सन्मानित

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२६ यंदा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना जाहीर करण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi Ticket To Finale: अखेर 'ही' सदस्य ठरली पहिली फायनलिस्ट, 'तिकीट टू फिनाले'च्या टास्कमध्ये मारली बाजी

मुंबई : बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi ) सीझन ६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले असून अनेक टास्क आणि आव्हानं पार करुन घरातील ७

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम दिशा वकानीच्या वडिलांचं निधन

मुंबई: टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील दयाबेनच्या भूमिकेसाठी ओळखली

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा