मुंबईच्या पदपथांची सुधारणा करणार, युनिव्हर्सल फुटपाथ पॉलिसी अंतर्गत करणार विकास रस्ते विकासासाठी ६८७५ कोटी रुपयांची तरतूद

मुंबई : युनिव्हर्सल फुटपाथ पॉलिसी' अंतर्गत अधिक पादचारी अनुकूल व दिव्यांग अनुकूल पदपथ निर्माण करण्यावर महानगरपालिका आता भर देत असून त्यानुसार, शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये काही विद्यमान पदपथांची सुधारणा व दर्जेनतीचे काम प्रायोगिक तत्वावर हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली.


मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते विभागासाठी सन २०२५-२६ च्या सुधारित अंदाजामध्ये ६००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आगामी सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अर्थसंकल्पात ६८७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील सुमारे २,११८ कि.मी. रस्त्यांच्या जाळ्यांचे जबाबदारीने देखभाल व परिरक्षण केले जाते. मुंबई ही देशाचा आर्थिक कणा आणि जागतिक चेहरा असल्याने, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार शाश्वत, टिकाऊ व पर्यावरणस्नेही रस्ते पायाभूत सुविधा बनविण्याच्या दिशेने सातत्याने पावले टाकत आहे.


७०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे काम दोन टप्प्यात हाती घेण्यात आलेले आहे. त्यापैकी, ३४२ कि.मी. रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले असून उर्वरित रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. अद्यापपर्यंत, सुमारे १,५६६ कि.मी. रस्ते/रस्त्यांच्या बाजूच्या पट्टयांची सिमेंट काँक्रीटमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. टप्पा-१ मधील ७५ टक्के आणि टप्पा-२ मधील ५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. टप्पा-१ मे २०२६ पर्यंत आणि टप्पा-२ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजिले आहे.



वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता उपाययोजना


रस्त्यावरील ६५ ठिकाणी सशुल्क वाहनतळे कार्यान्वित असून त्यांची एकूण वाहनक्षमता ८,२५८ एवढी आहे. याव्यतिरिक्त, ३७ ठिकाणी सार्वजनिक वाहनतळांच्या देखभालीसाठी कामे नेमून देण्यात आली आहेत.. त्यांची एकूण वाहनक्षमता २९,७६९ एवढी आहे.



भूमिगत वाहनतळ


श्री. सिध्दिविनायक गणपती मंदिराच्या सभोवतालच्या परिसराचे सौंदर्याकरण आणि उन्नतीचे काम तीन टप्प्यात करण्याचे नियोजित आहे. पहिल्या टप्पातील इतर कामांसोबतच तळपरात २ मजले भूमिगत वाहनतळ सुविधा उभारण्याच्या कामाचांही समावेश आहे. या भूमिगत वाहनतळ संकल्पना प्रथमतः जी/उत्तर विभागामध्ये राबविण्यात येणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर विभागातही ही संकल्पना राबविण्यातत येणार आहे



स्मार्ट वाहनतळ प्रकल्प


मुंबईमध्ये सुव्यवस्थित वाहतूक आणि नागरिकाभिमुख वाहनतळ व्यवस्था निर्माण करण्यासाठी, बृहन्मुंबई महानगरपालिका स्मार्ट वाहनतळ प्रकल्प राबविणार आहे. सद्यस्थितीत, या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. या उपक्रमांतर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील भागांसाठी मोबाईल पार्किंग अॅप्लिकेशर विकसित करण्यात येणार असून ज्याद्वारे नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर आपल्या इच्छित स्थळी जाण्यापूर्वी पार्किंगची जागा विशिष्ट वेळेसाठी आगाऊ आरक्षित करण्याचे सुविधा उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागिदारी (पीपीपी) तत्वावर राबविण्यात येणार असून त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर कोणताही आर्थिक भार येणार नाही तसेच कंत्राटदाराकडून टक्केवारीनुसार महसुलामधील हिस्सा प्राप्त होणार आहे. प्रारंभी, या प्रकल्पाची अंमलबजावणी ५३० नविन वाहतळांवर करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यांत इतर ऑन स्ट्रीट व ऑफ स्ट्रीट वाहनतळांचाही समावेश करण्याची तरतूद असल्यामुळे प्रवाशांच्या सोयीमध्ये वाढ होईल.

Comments
Add Comment

'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा

Devendra Fadnavis : गर्भवती मातांसाठी मोठी दिलासादायक बातमी; तीव्र रक्तक्षयावर उपचारांना मिळणार वेग

तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Major decision by MHADA : उमरखाडीतील १,९२८ रहिवाशांना मिळणार ५०० चौरस फुटांची हक्काची घरे!

मुंबई : भायखळा येथील ऐतिहासिक आणि दाट वस्तीच्या उमरखाडी परिसराचा समूह पुनर्विकास करण्याचा अत्यंत महत्त्वाचा

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)