संगमनेरमध्ये शिवजयंतीच्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

एकाला अटक ; शहरात भीतीचे वातावरण


संगमनेर : संगमनेर शहरात जुन्या वादातून एका तरुणावर पाच जणांच्या टोळक्याने कोयता आणि बेल्टने भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलिसांनी अटक केली आहे.


याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी ममता रोहित वाळके (वय २९, रा. श्रीरामनगर) यांचे पती रोहित वाळके हे २२ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० च्या सुमारास इंदिरानगर येथील म्हसोबा मंदिर जवळील मैदानावर 'टुर्ला' मॅच खेळण्यासाठी गेले होते. यावेळी हल्लेखोरांनी जुन्या वादाचा राग मनात धरून रोहित यांच्यावर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी शिवजयंतीच्या मिरवणुकीत नाचत असताना, रोहित यांचा मित्र उत्तम काकड याला आरोपींनी ओढल्यामुळे रोहित यांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले होते. याच कारणावरून या पाच जणांनी त्यांच्याशी वाद उकरून काढला.त्यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने रोहित यांच्यावर हल्ला चढवला. अथर्व रासने, ओम काथे, साहिल देवरे, सुमित शेवंते व शनैश रोकडे (सर्व रा. संगमनेर) यांनी रोहित यांच्या मानेवर कोयत्याने वार केला, खांद्यावर कोयता मारून गंभीर दुखापत केली, तसेच बेल्टने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.


या घटनेनंतर जखमी रोहित यांना तातडीने संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ममता रोहित वाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १६६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११८(१), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये अथर्व रासने याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि पोलीस उपनिरीक्षक पगारे यांनी घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान करत आहेत. शहरात अशा प्रकारे शस्त्राने हल्ला झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस